स्थानिक गुन्हा शाखेत सहाय्यक पोलीस निरिक्षक शेकडे, पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे आणि पुयड; कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के


नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेत तिन नवीन अधिकाऱ्यांना नियुक्ती दिल्याचे आदेश पोेलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत. सोबतच कुंडलवाडी येथे नवीन सहाय्यक पोलीस निरिक्षक पाठविण्यात आले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे आणि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे या तिन पोलीस उपनिरिक्षकांना त्यांच्या झालेल्या बदलीनुसार अनुक्रमे हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
रिक्त होणाऱ्या या जागांमुळे कुंडलवाडी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांना आणि सोबतच शिवाजीनगरचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे आणि जलद प्रतिसाद पथकातील पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड या तिघांना स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे.
सोबतच संतोष शेकडे यांच्या स्थानिक गुन्हा शाखेतील बदलीमुळे रिक्त झालेल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्यात अर्धापूर येथे कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के यांना नियुक्ती देण्यात आली आहे.


Post Views: 568


Share this article:
Previous Post: अर्धापूर पोलीसांनी परिवहन विभागासोबत ओव्हरलोड हायवा पकडल्या; 2 लाखांपेक्षा जास्त दंड

May 9, 2024 - In Uncategorized

Next Post: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 9, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.