स्कुटीच्या डिक्कीतून साडेसहा लाख लंपास

Read Time:3 Minute, 18 Second

नांदेड : प्रतिनिधी

चार चाकी वाहनातून ५० लाख रूपयांची बॅग चोरटयांनी पळविली होती.त्याचाच तपास अजून लागला नाही.ताचे शहरातील सोमेश कॉलनी परीसरात एका व्यापा-याचे स्कुटीच्या डिक्कीमधुन साडेसहा लाख रूपये असलेली बॅग लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.बॅग लुटींच्या या घटनांमुळे व्यापा-यात भितीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी वजिबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

भुसार दुकानाचे व्यापारी राजकुमार मुंदडा यांनी शुक्रवारी नवा मोंढा भागातील एका बॅकेतून रोख रक्कम काढली होती.यानंतर दुपारी एक वाजेच्या दरम्यान डॉक्टर लेन जवळील सोमेश कॉलनी येथे घरासमोर आपली पैसे ठेवलेली स्कुटी सोडून आत गेले.या दरम्यान अज्ञात तीन ते चार दरोडेखोरांनी स्कुटीची डिक्की तोडुन साडेसहा लाख रूपये लंपास केले. व्यापारी मुंदडा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे त्या ठिकाणाहुन पसार झाले होते.शहरात दिवसा ढवळ्या व्यापा-यांची लुटीच्या घटना वरचेवर घडत आहेत. यावरून चोरट्यांवर पोलिसांची कुठलीच वचक राहिली नाही.,हे उघड होत आहे.

मागच्या काही दिवसापासुन शहरात चोरीच्या घटनात वाढ झाली असुन चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहेग़ेल्या आठवड्यात इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन बाफना मोटर्स परीसरातुन भोकर येथील एका व्यापा-याची ५० लाखाची बॅग चोरीस गेली होती. त्या घटनेतील आरोपीचा शोध अद्याप लागला नसताना पुन्हा एकदा चोरट्यांनी सोमेश कॉलनी भागातुन एका व्यापा-याची साडे सहा लाख रूपये असलेली बॅग चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली. त्यामुळे शहरातील व्यापा-यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी घटस्थळी भेट देवुन तेथील सीसीटीव्ही कॅमे-याची पाहणी केली असुन काही संशयीतांचे फुटेज ताब्यात घेतले आहेत.या दिशेने चोरटयांचा शोध घेणे सुरू झाले असून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

9 − six =