May 19, 2022

सोयाबीनच्या दरात तेजी कायम; ७५७१ रूपये प्रति क्विंटल दर

Read Time:3 Minute, 16 Second

लातूर : लातूरच्या आडत बाजारात बुधवार दि. १९ मे रोजी ४ हजार २५ क्विंटल सोयाबिनची आवक झाली. सोयाबीनची आवक घटत असल्याने बुधवारी यावर्षीचा आजपर्यंतचा सर्वाधिक ७ हजार ५७१ रूपये प्रतिक्विंटल उच्चांकी दर मिळाला आहे. २०१४-१५ नंतर सोयाबीनचा दर यावर्षी सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहचला आहे. सोयाबीनच्या शेतमालास दिवसेंदिवस उच्चांकी दर मिळत असल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लातूर जिल्हयात गेल्यावर्षी ऑक्टोबर अखेर पर्यंत सरसरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी खरीप हंगामात ५ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली होती. यात ४ लाख ८ हजार १६४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. शेतक-यांनी सोयाबीनची काढणी केल्या नंतर कांही दिवसात ते बाजारपेठेत विकून मोकळे झाले होते. त्यामुळे आज सोयाबीनची आडत बाजारात आवक कमी होत आहे. सोयाबीनच्या पेंढीला असणारी मागणी वाढत असल्याने सोयाबीनच्या तेलाचे दर त्यामुळे सोयाबीनच्या दरातही वाढ होत आहे.

लातूरच्या आडत बाजारात यावर्षी बुधवार दि. ६ जानेवारी रोजी २२ हजार ३९० क्ंिवटल सोयाबिनची आवक होऊन ४ हजार ५९१ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुरूवार दि. १८ फेब्रुवारी रोजी १२ हजार ९८८ क्ंिवटल सोयाबीनची आवक होऊन ४ हजार ९५६ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बुधवार दि. ३ मार्च रोजी १६ हजार ४५० क्विंटल सोयाबिनची आवक होऊन ५ हजार १५१ रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.

सोमवार दि. २२ मार्च रोजी ८ हजार ३४ क्विंटल सोयाबिनची आवक होऊन ५ हजार ५७० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी दि. ५ एप्रिल रोजी ७ हजार ६८८ क्विंटल सोयाबिनची आवक होऊन ६ हजार १८६ रूपये प्रतिक्विंटल उच्चांकी दर मिळाला. मंगळवार दि. १३ एप्रिल रोजी ७ हजार ३०७ क्विंटल सोयाबिनची आवक होऊन ७ हजार २९ रूपये दर मिळाला. बुधवार दि. १९ मे रोजी लातूरच्या आडत बाजारात ४ हजार २५ क्विंटल सोयाबिनची आवक होऊन ७ हजार ५७१ रूपये प्रतिक्विंटल उच्चांकी या वर्षाचा सर्वाधिक दर मिळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 + twenty =

Close