
सोयाबीनच्या दरात झपाट्याने घसरण
शिवणी : खरीप हंगाम च्या सुरुवातीपासून किनवट तालुक्यासह राज्यात अनेक वेळा पावसाचा मोठा खंड तर कधी अतिवृष्टी अशा अनियमिततेच्या पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतक-यांसाठी आणखी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसात दहा हजारच्या वर गेलेले सोयाबीनचे दर आता झपाट्याने घसरत सहा हजार पर्यंत येऊन ठेपल्याची चर्चा शेतक-यांत आहे तर अनेक संकटांना सामोरे जाऊन घाम गाळून काळ्यामातीतून सोने पिकवणा-या शेतक-्यांना पुन्हा निराशाचेच दिवस झेलावे लागतील असे दिसून येत असल्याने शेतकरी चिंता तूर होत आहे.
निसर्गाच्या चक्रात सापडलेल्या शेतक-यांच्या सोयाबीनला किमान बाजार भावाचा तरी आधार मिळेल अशी आशा होती मात्र गेल्या आठवड्यापासून सोयाबीन चे आवक येत असल्याने दोन दिवसात दोन हजारांनी सोयाबीन चे दर घसरले असून या पुढे आवक वाढीस जस जसे सुरुवात होईल तसे त्याच गतीने सोयाबीन चे दर घसरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्या मुळे भविष्यात काय भाव राहतील ह्याची धास्ती शेतक-यांमध्ये निर्माण झाली आहे.तर कमीत कमी प्रति क्विंटल सहा हजार रुपये च्या वर तरी सोयाबीन चे दर रहावे अशी आशा शेतकरी वगार्तून व्यक्त केली जात आहे.तर सध्या किनवट तालुक्यातील शिवणी बाजार पेठेत प्रति क्विंटल सहा हजार तीनशे चा भाव आहे.असे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे.