सोनु सुदच्या बहिणीची राजकारणात एन्ट्री! पत्रकारपरिषदेत केली घोषणा

Read Time:1 Minute, 57 Second

बॉलीवुड अभिनेता सोनु सुदने कोरोनाकाळात केलेल्या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत होते. सोनु सुदच्या समाजकार्यामुळे आगामी काळात तो राजकारणात पाऊल टाकणार या चर्चांना ऊधान आले होते. नुकतीच एक पत्रकारपरिषद घेऊन सोनु सुदने मोठा राजकीय भुकंप केला आहे.

सोनु सुदची बहिण मालविका सुद सुच्चर राजकारणात पाऊल ठेवणार असल्याचे सोनु सुदने घोषीत केले आहे. आगामि काळातील पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी मालविका सुद सुच्चर निवडणुकीत ऊतरणार असल्याचे जाहीर झाले आहे.

मालविका सुद निवडणुल लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरि कुठल्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात ऊतरणार याबद्दल कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र मालविका सुदचे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरींदर सींग यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहे.

मालविका सुदसुद्धा पंजाबमध्ये समाजकार्यातसुद्धा सक्रीय आहे. सोनु सुदचे फोटोसुद्धा अमरिंदर सिंग यांच्यासोबत व्हायरल झाल्यामुळे अमरिंदर सिंगसोबत सोनु सुद निवडणु लढवणार अशा चर्चांना ऊधान आले होते. मात्र सोनु सुदने स्वत:ऐवजी बहिणीचे नाव पुढे केले आहे. सोनु सुदसुद्धा निवडणुक लढवण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याच्या शक्यतासुद्धा वर्तवण्यात येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + twelve =