सोनं खरेदी करण्याची सोनेरी संधी, सोन्याच्या दरात मोठी घसरण

Read Time:1 Minute, 27 Secondमुंबई । सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आठवड्याच्या सुरूवातीलाच एक आनंदाची बातमी आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत जवळजवळ 125 रुपयांची (0.26%) घसरण होऊन ती प्रति तोळा 50,400 रूपयांवर आली आहे. तर चांदीच्या किमतीत वाढ होऊन ती प्रति किलो 55,085 रुपयांवर पोहचली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर वधारले होते. India Bullion And Jewellers Association म्हणजेच IBJA कडून माहिती समोर आली होती. त्या माहितीनुसार गेल्या व्यावसायिक आठवड्याच्या (22 ते 26 ऑगस्ट) सुरूवातीला 24 कॅरेट सोन्याचा दर 50,770 प्रति तोळा इतका होता. हा दर शुक्रवारी वाढला आणि 50,877 रूपये प्रति तोळ्यावर जाऊन पोहोचला. तर 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 63,363 रुपयांवरून 54,700 रुपयांवर पोहचला आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (संशोधन आणि कमोडिटी) अनुज गुप्ता यांनी सांगितलं की या आठवड्यात सोने आणि चांदीच्या सकारात्मक व्यवहारांची अपेक्षा आहे.Leave a Reply

Your email address will not be published.

three × 4 =