सैराट फेम रिंकू राजगुरू या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यासोबत करणार काम

Read Time:6 Minute, 51 Second

सैराट फेम रिंकू राजगुरू या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यासोबत करणार काम, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मराठी मध्ये एक तरुण अभिनेत्री अशी इंडस्ट्रीत आली आणि सगळ्याला भुरळ घालून उभी आहे. जिला घराघरात ओळखले जाते. तिला तरुणांपासून म्हातारे सगळेच ओळखतात. त्या प्रसिद्ध अश्या लोकप्रिय अभिनेत्री चं नाव आहे रिंकू राजगुरू.

Rinku Rajguru

होय हीच रिंकू आरची म्हणून सैराट मध्ये फेमस झाली. ज्यात तिची भूमिका प्रचंड वाजली आणि ती खूप लोकप्रिय झाली. फक्त मराठीत नव्हे तर तिने बॉलिवूड मध्येही अनेक कामे केली आहेत. रिंकू हे नाव आता खूप मोठं झालं आहे.

हे नाव सोशल मीडियावर सतत चर्चेत असतं. तीही चाहत्यांना खूप उत्तरे देती. तिचे करोडो चाहते आहेत. ती जिथं जाईल तिथं तिला पाहण्यासाठी गर्दी करतात लोक. तर अश्या अभिनेत्री बद्दल एक गुड न्यूज आहे.

vvygeuz095hiq29w 1587455073

ती एका प्रसिद्ध अभिनेत्या शी बॉलिवूड मध्ये अभिनय करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक यांच्या दिग्दर्शनावाखाली. आता आपल्याला अनेक प्रश्न पडले असतील की तो अभिनेता आणि दिग्दर्शक कोण ? तर चला मग सगळे उत्तरे सविस्तर जाणून घेऊयात.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. कारण तिला माहितेय की आपण जर चाहत्यांना उत्तरे दिली संपर्कात राहिलो तर चाहते आपल्याला तेवढं सपोर्ट करतील.

whatsapp image 2021 03 26 at 3.09.33 pm 202103587843

काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत तिने शूटिंगला सुरूवात केल्याचे सांगितले होते. तसेच तिने सेटवरील तिचे फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर केले होते. आता समजते आहे की, रिंकू बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. अमोल पालेकर हे खूप दिगग्ज असं नाव आहे. त्यांचं काम म्हणजे खूप वेगळं असतं. त्यांच्या कामाची पद्धत रिंकू ला जवळून पाहायला आणि सोबत अनुभवायला भेटणार आहे.

रिंकू राजगुरूने रविवारी म्हणजेच २१ मार्चला इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो शेअर करत शूटिंगचा पहिला दिवस असल्याचे सांगितले होते. रिंकू राजगुरू सध्या दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे. सार्थक दासगुप्ता त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्यांच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

rinku rajguru 1587978430

तिने काही फोटो सेटवरचे शेयर केलेले आहेत. त्यामुळे नव्या ठिकाणी काम करते आहे याचा अंदाज बांधला जात आहे.या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत अमोल पालेकर दिसणार आहेत. अद्याप या प्रोजेक्टबद्दल जास्त माहिती मिळालेली नाही. मुंबईतील लाइमलाइट स्टुडिओत हे शूटिंग पार पडत आहे. सार्थक दासगुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रिंकू राजगुरूचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती कोर्टात बसलेली दिसते आहे.

तसेच त्यांनी इंस्टाग्रामवर अमोल पालेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यात अमोल पालेकर यांचा गेटअप पाहून ते वकिलांची भूमिका साकारत असल्याचे समजते आहे. रिंकू सध्या सुसाट सुटलेली आहे. तिचं काम ही खूप उत्तम होत आहे. तिला सध्या कामाची काहीच कमी नाही. खूप बिझी होऊन गेली आहे.

j 1

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. याचं शूट ही तिने काही दिवसांपूर्वी पूर्ण केलं आहे. यात ही तिने खूप साऱ्या लोकांसोबत कामे केलेली आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

2549fcda9f8b83cc4bc7f53b119e87ad

रिंकू राहते अकलूज ला. पण सध्या ती अकलूज ची कमी आणि मुंबई ची जास्त वाटायला लागली आहे. कारण शूट निमित्ताने ती नेहमी मुंबईत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − 13 =