सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु


नांदेड,(जिमाका)- माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880/8380873985 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते. प्रवेश सैनिक/ माजी सैनिकांच्या विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरिक पाल्यांना सुध्दा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. या वसतीगृहात उत्तम जेवणाची सोय (आठवड्यातून तीन वेळा नॉन-वेज/वेज व नाश्त्यामध्ये अंडी), स्वतंत्र अभ्यासिका, जिमखाना, भोजनालय कक्ष तसेच सकाळी पीटी आणि सायंकाळी रोल कॉल या सर्व सोयींनी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.


Post Views: 73


Share this article:
Previous Post: नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 37 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 23 पोलीस उपनिरिक्षकांचे जिल्हा बदल

June 29, 2024 - In Uncategorized

Next Post: रिंदाच्या नावासह दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींची मुक्तता

June 29, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.