सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेशाम मोपलवारकडे 3 हजार कोटी पेक्षा जास्तची बेहिशोबी मालमत्ता-आ.रोहित पवार


नांदेड(प्रतिनिधी)-प्रशासनाच्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रत्येक अधिकारी खरे बोलावे, खोटे काम करु नये, भ्रष्टाचार करू नये अशा शिकवणी जनतेला देतात परंतू ते प्रत्यक्षात याच्या विरुध्द वागतात.काही लोकांना बऱ्याच बाबी माहित असतात पण ते बोलत नाहीत. परंतू अशाच एका प्रकारणात आ.रोहित पवार यांनी सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्याकडे 3 हजार कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला आहे.
वर्तमानपत्रातून बहुतांश वेळी नेते मंडळींनी केलेले घोटाळे छापले जातात. त्यावर चर्चाही होते. पण नेत्यांना हे घोटाळे कोण करायला लावते याबाबत कधीच कोणी बोलले नाही. सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्यावर नेत्यांची नेहमीच कृपादृष्टी राहिली. नांदेड जिल्ह्यात शिक्षण, नांदेड जिल्ह्यातच मराठवाडा ग्रामीण बॅंकेत नोकरी आणि त्यानंतर उपजिल्हाधिकारी पदी निवड असा त्यांचा सुरूवातीचा प्रवास. राधेशाम मोपलवार हे गुर-ता-गद्दीच्या काळात नांदेडचे जिल्हाधिकारी होते. मुळात त्यांना 1995 मध्ये आयएएस पदोन्नती मिळाली होती. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील ते रहिवासी आहेत. नांदेडला जिल्हाधिकारी असतांना मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे होते. केंद्र सरकारने त्या कार्यक्रमासाठी 2 हजार 500 कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यात एक सर्वात महत्वाची अट अशी होती की, नांदेडच्या रस्त्याची उभारणी नेदरलॅंड या देशाच्या धर्तीवर व्हावी. त्या तयारीमुळे नांदेडच्या शहरातील वाहतुक सुरळीत होण्याऐवजी जास्त बिघडली. आता तर त्या रस्त्यांची वाट लागली आहे. या शिवाय महसुल खात्यात सर्वात महत्वाचा विषय वाळु आणि या वाळुबद्दल त्यांच्या काळात कधीच कार्यवाही झालेली नव्हती. आपल्या विरुध्द वर्तमानपत्रांनी काही छापू नये याचीही दक्षता ते घेत होते आणि त्याच्यासाठी जे काय करावे लागते ते सर्व करत होते. अशा परिस्थितीत त्यांनी नांदेडचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर पुढे मुंबईला बदली झाली आणि त्या ठिकाणी सुध्दा त्यांनी वेगवेगळ्या मोठ्या पदांवर त्यांनी काम केले. सन 2018 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्याही वेळी त्यांच्यावर नेत्यांची कृपादृष्टी असल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नेमणुक करण्यात आली.
याच महामंडळाने समृध्दी महामार्ग तयार केले आहेत. आजच्या परिस्थितीत आजपर्यंत समृध्दी महामार्गांवर 1282 अपघात झाले आहेत. त्यात 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ असा लावता येईलच की, त्या रस्त्यांच्या तयार करण्यामध्ये कुठे तरी चुक आहेच आणि कार्यकारी संचालक म्हणून त्याची जबाबदारी सुध्दा मोपलवार यांच्यावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक करण्यामागे नेत्यांचा सुध्दा काही तरी हात असेलच. रोहित पवार यांनी केलेला त्यांच्यावरचा आरोप 3 हजार कोटी पेक्षा जास्तची बेहिशोबी मालमत्ता याची चौकशी झाल्याशिवाय काय खरे आहे हे समोर येणार नाही. आजच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये प्रवर्तन निदेशालयाची भिती देशातील प्रत्येक नागरीकाला आहे. महाराष्ट्रात सुध्दा भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. त्यांनी राधेशाम मोपलवार यांची चौकशी प्रवर्तन निदेशालयातर्फे केली तरच राधेशाम मोपलवार यांच्या संपत्तीची खरी माहिती समोर येईल.


Share this article:
Previous Post: श्रेयस देशपांडे यांच्या “वारी पंढरीची” गाण्याने दुमदुमले इंटरनेट विश्व

July 10, 2024 - In Uncategorized

Next Post: खरेदी केलेल्या दागिण्यांवर शिक्का मारणे आवश्यक असते म्हणून डल्ला

July 11, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.