सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश डोणेराव यांचे निधन


नांदेड – जिल्हा परिषद, नांदेडचे सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पुंडलिकराव डोणेराव, वय 58 वर्षे, रा. नागसेन नगर, नांदेड यांचे आज गुरुवार 4 जुलै 2024 रोजी दुपारी चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सुरेश डोणेराव यांच्या पार्थिवावर, शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गोवर्धन घाट येथील शांतीधाम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

बिलोली येथील आरोग्य केंद्रातून सुरेश डोणेराव नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. सुभेदार रामजी आंबेडकर सोसायटीचे सचिव होते. त्यासोबतच सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते.


Post Views: 34


Share this article:
Previous Post: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी – VastavNEWSLive.com

July 4, 2024 - In Uncategorized

Next Post: पंचशिल नगरमधील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा -बंटी लांडगे

July 4, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.