सेट परीक्षेत मुखेड येथील शिक्षक दाम्पत्याने मारली बाजी!

Read Time:2 Minute, 29 Second

नांदेड दि.३०- यूजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून  मुखेड शहरातील विद्यार्थीप्रिय शिक्षक दाम्पत्याने यश मिळविले आहे.

झेप कोचिंग क्लासेस चे  शिक्षक महेश माधव वंटेकर हे लाइफ सायन्स तर त्यांच्या पत्नी सौ. सोनम  वंटेकर यांनी एज्युकेशन या विषयातून एकदाच सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एक नवीन इतिहास रचला. पती पत्नी एकदाच सेट परीक्षेत यशस्वी होण्याची ही पहिलीच घटना आहे.
महेश वंटेकर यांच शालेय शिक्षण मुखेड शहरातील गुरुदेव विद्या मंदिर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर व  यशवंत महाविद्यालय नांदेड येथे पुर्ण झाले तर  सोनम वंटेकर यांच शालेय शिक्षण लातूर जिल्ह्यात तर इंजिनिअरिंग हे नांदेडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथुन पुर्ण केल त्यानंतर त्यांनी कार्लोक्स टिचर युनिव्हर्सिटी येथुन एम. ए. एज्युकेशन ची डिग्री मिळवली. सोनम यांचे वडील एल. आर. कांबळे (कोळी) हे महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (ए.पी.आय) बिड शहर येथे सेवेवर आहेत. तर महेश हे सेवा निवृत्त मुख्य रोखपाल माधव वंटेकर यांचे चिरंजीव आहेत.
शहरातील सर्व विद्यार्थी पालक, शिक्षक, विविध संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक संस्था अश्या सर्व स्तरातील नागरिकांकडून वंटेकर दांपत्याचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

five × 5 =