सुसज्ज वसतिगृह विद्यार्थ्याच्या लवकरच सेवेत

Read Time:3 Minute, 8 Second

लातूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, मुंबई (रूसा) व दयानंद शिक्षण संस्था, लातूर यांच्या संयुक्त निधीतून बांधल्या जाणा-या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या मुलांच्या वस्तीगृहाचा भूमिपूजन सोहळा दि. २० जुलै रोजी संपन्न झाला असून भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण
लाहोटी होते. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, संस्थेचे बांधकाम सभापती मकरंद सावे, सतीश चापसी, दिनानाथ भुतडा, बालकिशन बांगड, मालू, विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. क्रांती सातपुते, प्राचार्य डॉ. पूनम नाथानी, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, कार्यालयीन अधीक्षक राजेश सेलुकर, रूसा समन्वयक डॉ. राहुल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी सावे यांनी होणा-या अशा वस्तीगृहाच्या बांधकामासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष लाहोटी म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्था व रूसाच्या माध्यमातून विविध सुख-सुविधांनीयुक्त सुसज्ज असे वसतिगृह बांधून विद्यार्थ्यांच्या-मुलांच्या राहण्याची उत्तम सोय केली जाईल. शिक्षण, गुणवत्ता आणि राहण्याची सोय यामुळे विद्यार्थी घडतील असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी प्रास्ताविकातून दयानंद विज्ञान महाविद्यालयास रुसाकडून २ कोटीचे मिळालेले अनुदान व दयानंद शिक्षण संस्थेची वसतिगृह बांधण्यामागची भूमिका विशद केली तर आभार रूसा समन्वयक डॉ. राहुल मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर स्वामी यांनी केले. याप्रसंगी डॉ. ललित ठाकरे, डॉ. श्रेयस माहुरकर, डॉ. महादेव पंडगे, प्रा. बळवंत सूर्यवंशी, डॉ. विजेंद्र चौधरी, डॉ. शेटकार रामशेट्टी, शांतेश्वर बरबडे, गजानन पसारकर, दामोदर साळुंके, राजाभाऊ साळुंके, अक्षय कुलकर्णी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

thirteen + 16 =