
सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन!
नांदेड दि.२ -भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांचा 109 वा स्मृतिदिन आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी श्रद्धा येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर व दक्षिण च्या वतीने संयुक्तिक रीत्या साजरा करण्यात आला या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष तथा माजी न्यायाधीश डॉक्टर यशवंतराव चावरे हे होते.
सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या प्रतिमेस अध्यक्षांच्या हस्तेपुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय सचिव संबंधी सोनकांबळे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे विचार अनिताताई खंदारे रेखाताई खंदारे लता ताई शिंदे युवराज मोरे माधवराव सरपे सा.ना. भालेराव यांनी यावेळी मांडले. विभागीय सचिव समृद्धी सोनकांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेचे प्रचार व प्रसाराचे काम अव्याहत चालू राहण्यासाठी कार्यकर्त्यांचे संघटन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून संस्थेच्या प्रचार कार्यास वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहन केले.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे निदेशक बिहार सरकटे यांनी आपले विचार व्यक्त करताना महापुरुषांच्या जयंत्या स्मृतिदिन आधी सण उत्सवाचे महत्व विशद करून त्या महापुरुषांचे विचार पुढील पिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी साजरे करावयाचे असतात असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर यशवंतराव चावरे यांनी सुभेदार रामजी आंबेडकर हे आदर्श पिता कसे ठरतात हे विशद करून रामजी बाबा आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर स्वरचित काव्य पाठ सादर केला. त्यावेळी जिल्हा शाखा वार्ड शाखा तालुका शाखा पदाधिकाऱ्यांसह धम्मा प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार उपाध्यक्ष रविकिरण जोंधळे तर आभार प्रदर्शन सुभाष नरवडे यांनी केले