August 9, 2022

सुकामेवा, पेंडखजूर 20% महागले

Read Time:5 Minute, 3 Second

लातूर : रमजान महिना आता संपत आला आहे. चंद्रदर्शन होताच ईद-उल-फित्र (रमजान ईद) साजरी होाणर आहे. ईद गुरुवारी होते की, शुक्रवारी हे चंद्रदर्शनावर अवलंबुन आहे. रजमान ईदचा मुख्य मेन्यु म्हणजे ‘शिरखुर्मा’. यासाठी लागणारा सुकामेवा आणि इफतारसाठी आवश्यक पेंढ खजुर सुमारे वीस टक्क्यांनी महागले आहेत. मंगळवारी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आल्याने सुकामेवा व इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली होती.

‘शिरखुर्मा’ साठी काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, चारोळी, मनुका, सुके खजूर आदी सुमामेवा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे मालाची आयात बंद आहे. त्यामुळे सुकामेवाचे जिन्नस बाजारपेठेत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मंगळवार दि. ११ मे रोजी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणाात सुट देण्यात आल्याने ‘शिरखुर्मा’चा सुकामेवा व इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ बहरली होती. रोजादारांना पेंडखजूर आवश्यक असतात. त्यामुळे पेंडखजूरास मोठी मागणी असते. दरवर्षी इराण, इराक, सऊदी अरेबिया, कतार आदी विविध देशांतून पेंडखजूर आयात होतात. परंतु, यावषी कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्यामुळे देशात उपलब्ध पेंडखजूर शहरातील व्यापा-यांनी मागवले आहेत. परिणामी यंदा सुकामेवा व पेंडखजूराची दरवाढ २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. स्थानिक बाजारपेठेत पेंडखजूराची चणचण भासत आहे.

प्रति रमजानमध्ये विदेशातून भारतात पेंडखजूरांची मोठी आयात होते. सऊदी अरेबिया आणि इराणमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले असल्याने तेथुन निर्यात होणारा माल कडक तपासणी करुनच पाठविला जात आहे. शिवाय सध्या विमान सेवा बंद असल्याने आयात बंदच आहे. परिणामी भारतातील व्यापा-यांना रमजानपुर्वी पेंडखजूर खरेदी करता आलेला नाही. यामुळे पेंडखजूराच्या भावात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. यंदा किमीया, मझाफती, एम्पायर, अरेबियन पिअर्स, झागरझायी, मरियम हे पेंडखजूर ७०० रुपये किलोने विकले जात आहेत. मदनी, कलमी, मदनी मगरुर, मदनी मशरुख, मदनी सुगई, मदनी सुखरी आदी प्र्रकारचे पेंडखजूर कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा दर ५०० रुपये ते ६५० रुपये किेलो असा आहे.

नियमित खजूरापेक्षा मदनी खजूराला मागणी वाढली आहे. जेशव खजूरी, रब्बी खजूर, माबरुम खजूर आदी प्रकारचे पेंडखजूर कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. यंदा ग्राहकांना निवडण्यासाठी पेंडखजूरचे विविध प्रकार उपलब्ध नाहीत. आहेत त्यातूनच निवड करुन पेंडखजूर घ्यावे लागत आहेत.

बाजारपेठ गजबजली
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात वीकेंडसह कडक निर्बंध घातले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरु ठेवण्याची मूभा देण्यात आली होती. परंतू, दि . ८ ते १३ मे या कालावधीत पुन्हा कडक लॉकडाऊनचा आदेश काढण्यात आला होता. परंतू, रमजान ईदनिमित्त मंगळवार व बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुकामेवा, भाजीपाला, बेकरी, अंडी, मटन, चिकन, मासे आदी दुकाने सुरु ठेवण्याची सुट देण्यात आल्याने मंगळवारी बाजार पेठ गजबजली होती. दरम्यान महानहगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी स्वत: गंजगोलाईत उपस्थित राहून बाजरापेठेची पाहणी केली. अनावश्यक गर्दी होणार नाही. यासाठी पंोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

15 + nine =

Close