सीमेवर ‘बोफोर्स’ तैनात

Read Time:4 Minute, 21 Second

नवी दिल्ली : चिनी सैन्याने लडाखनंतर अरुणाचल प्रदेश भागात हालचाली वाढविल्या आहेत. मिसाईल, लढाऊ विमानांची तैनाती मोठ्या प्रमाणावर करू लागला आहे. यामुळे भारतानेही विश्वासघातकी चीनला जरब बसविण्यÞासाठी शत्रूच्या छातीत धडकी भरविणा-या बोफोर्स तोफा एलएसीवर तैनात केल्या आहेत.

भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत.

चीन आणि भारताच्या सीमारेषा मिळतात त्या पॉईंटजवळ बुम ला पास येथे या बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत. हा भाग चीनच्या तवांग सेक्टरला जोडलेला आहे. याचबरोबर चीनला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने हवाई दलाच्या मदतीने हवाई हल्ले करणारी, टेहळणी करणारी विमाने देखील तैनात केली आहेत. यामध्ये हेरॉन आय ड्रोन, सशस्त्र हेलिकॉप्टर रुद्र आणि ध्रुव तैनात करण्यात आले आहे. या ंिवगमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता हेलिकॉप्टर होते, ते आता नव्या अद्ययावत हेलिकॉप्टरनी बदलण्यात आले आहेत. आयएएनएसनुसार स्वदेशी बनावटीची ही हेलिकॉप्टर वजनाने हलकी असून, डोंगराळ भागात वेगाने काम करू शकतात. यामुळे ही हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये तैनात करण्यात आली आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली स्क्वाड्रनदेखील तयार करण्यात आली आहे.

चिनी रॉकेट लॉन्चर सीमेवर
गलवान खो-यात भारतीय जवानांनी बलिदान दिले पण देशाच्या ताब्यातील भूभाग सुरक्षित राखला. या संघर्षामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शंभरपेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स लाँग रेंज रॉकेट लाँचर आणि १५५ मिमी कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज केल्या आहेत. चिनी सैन्याच्या हालचालींची दखल घेऊन भारतीय सैन्याने तीन रेजिमेंट तैनात केल्या आहेत. तसेच एम ७७७ अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफांचा ताफा सज्ज ठेवला आहे.

३५० किमी मारा करणारे लाँचर
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पीसीएल १९१ रॉकेट लाँचर पण सज्ज ठेवले आहे. या सिस्टिमच्या प्रत्येक ट्यूबमधून ३५० किमीपर्यंत पल्ला असलेली ताशी ६० किमी वेगाने उड्डाण करणारी रॉकेट हल्ल्यासाठी सज्ज ठेवली असल्याचे वृत्त आहे. प्रत्येक युनिटमध्ये ३७० मिमी.च्या आठ लाँचर ट्यूब आहेत.

सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज
चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ १५५ मिमी कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज केल्या आहेत. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार १०० पेक्षा जास्त तोफा चीनने सज्ज ठेवल्या आहेत. या तोफांची क्षमता भारतीय तोफांपेक्षा दुप्पट असल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. तसेच लडाख जवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ १२२ कॅलिबरच्या पीसीएल १८१ सेल्फ प्रोपेल्ड हॉवित्झर तोफा सज्ज केल्या असल्याचेही चिनी माध्यमांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + 8 =