May 19, 2022

सीमेजवळून चीनच्या २२ लढाऊ विमानांनी घिरट्या

Read Time:3 Minute, 3 Second

चिनी हवाई दलाने पूर्व लडाखच्या दुस-या बाजूला मोठा युद्धसराव केला. या युद्धसरावावर भारतीय लष्कराची नजर अर्थात होतीच. सीमेजवळून चीनच्या २२ लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्या. या दरम्यानही भारतीय लष्कराने लडाख परिसरात सातत्याने ‘एरियल पेट्रोलिंग’ (हवाई गस्त) सुरूच ठेवले होते.

सूत्रांकडून वृत्तसंस्थेला सांगण्यात आले, घिरट्या घालणाºया चिनी विमानांमध्ये जे-११ आणि जे-१६ ही लढाऊ विमाने समाविष्ट होती. तथापि ही विमाने चिनी सीमेतच घिरट्या घालत होती. सीमेलगत चिनी भागात आता काँक्रिट बांधकाम केले गेले आहे, जेणेकरून हवाई तळावर किती लढाऊ विमाने आहेत, हे कुणाला कळू नये. अगदी उपग्रहीय छायाचित्रणाच्या टप्प्यातही ती येऊ नयेत, अशी काळजी चिनी बाजूकडून घेतली गेली आहे.

भारताने हवाई ताकद वाढविली
लडाखमधील दोन्ही बाजूंच्या सैन्य माघारीनंतर चीनकडून हवाई हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. होतान, गार गुंसा आणि काश्गर हवाई तळावरून चिनी लढाऊ विमानांनी उड्डाणे घेतली होती. ही हवाई तळे आता हरतºहेच्या लढाऊ विमानांना उड्डाण घेण्यास अनुकूल बनविण्यात आली आहेत. हवाई तळांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. भारतीय लढाऊ विमानांनीही उत्तरादाखल या भागात उड्डाणे घेतली. अर्थात आता भारताच्या ताफ्यातील २४ राफेल लढाऊ विमानांमुळे ‘एलएसी’वर (लाईन आॅफ अ­ॅक्चुअल कंट्रोल) भारताची ताकद वाढलेली आहे.

चीनची हवाई सरंक्षण यत्रंणा ‘जैसे थे’
चीनने पँगाँग सरोवर परिसरातून आपले सैन्य मागे घेतलेले असले तरी हेडक्­वार्टर-९ आणि हेडक्­वार्टर-१६ वरील हवाई संरक्षण यंत्रणा हटविलेली नाही. ही यंत्रणा लांब अंतरावरील लढाऊ विमानांचा लक्ष्यभेद करू शकते. म्हणूनच एप्रिल-मे दरम्यान भारताने आपल्या आघाडीच्या हवाई तळांवर ‘सुखोई-३०’ आणि ‘मिग-२९’ ही तैनात करून ठेवली आहेत. ही विमाने या लक्ष्यभेदी यंत्रणेचाही मुकाबला यशस्वीपणे करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

12 + 17 =

Close