June 29, 2022

सीबीआयचे ७६ ठिकाणी छापे

Read Time:3 Minute, 49 Second

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी महाराष्ट्रासह १४ राज्यांत कारवाई

नवी दिल्ली : आॅनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने देशातील सुमारे १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सुमारे ७६ ठिकाणी छापा टाकला आहे. तपास यंत्रणेने १४ नोव्हेंबरला ८३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयनेच्या पथकाने आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांती तब्बल ७६ ठिकाणांवर धाडी टाकल्या.
लहान मुलांचे अश्लील व्हीडिओ तयार करून त्यांनी शेअर व प्रसारित केल्याप्रकरणी सीबीआयने आज देशातील ७६ ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार १४ नोव्हेंबरला या प्रकरणात २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर ८३ जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी आज सकाळपासून सीबीआयचे पथक देशातील १४ राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ७६ शहरांमध्ये सर्चिंग आॅपरेशन करत आहे, असे सीबीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले. सकाळी आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी छापा मारण्यात आला. देशातील सुमारे १४ राज्यांमध्ये ही कारवाई केली जात आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने अलिकडेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये देशभरातील मुलांविरुद्ध सायबर गुन्ह्यांमध्ये ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे लैंगिक छळ प्रकरणात बालकांचे चित्रण करणाºया सामग्रीचे प्रकाशन आणि प्रसारणाशी संबंधित आहेत.

चाईल्ड पोर्नोग्राफीत यूपीत सर्वाधिक गुन्हे…

एनसीआरबी २०२० च्या रिपोर्टनुसार चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात काही राज्य आघाडीवर आहे. त्यात उत्तर प्रदेशात १६१, महाराष्ट्रात १२३, कर्नाटकात १२२ आणि केरळमध्ये १०१ चाइल्ड पोर्नोग्राफी गुन्हे दाखल झाले आहेत. यासोबतच ओडिसामध्ये ७१, तामिळनाडूत २८, आसाम २१, मध्य प्रदेश २०, हिमाचल प्रदेश १७, हरियाणा १, आंध्र प्रदेश १५, पंजाब ८ आणि राजस्थानमध्ये ६ गुन्हे दाखल आहेत. यापैकी आज केरळ व कर्नाटक वगळता बाकीच्या राज्यात सीबीआयने छापेमारी केली. यासोबतच गुजरात आणि दिल्लीत देखील चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 2 =

Close