January 19, 2022

सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ

Read Time:2 Minute, 24 Second

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना आता सर्वसामान्यांना परवडणा-या सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपये आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात प्रति युनिट १.५० रुपयांची वाढ झाली आहे. शनिवार मध्यरात्रीपासूनच दरवाढ लागू होणार आहे. परिणामी सर्वसामान्यांना दणका बसणार आहे.

मुंबई मेट्रोपोलिटन परिसरात गेल्या वर्षभरात म्हणजेच फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत सीएनजीच्या दरात तब्बल प्रतिकिलोमागे १८ रुपयांची दरवाढ झाली आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि बस सीएनजीवर चालतात. त्यामुळे आता टॅक्सी तसेच ऑटोरिक्षा चालकांनीही प्रवासी भाड्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. टॅक्सीच्या प्रवासी भाड्यात किमान ५ रुपयांची तर रिक्षाच्या प्रवासी भाड्यात किमान २ रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी व पीएनजीच्या नवीन दरवाढीचा मेट्रोपोलिटन शहरातील

सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे.
राज्यातील सर्वसामान्य नागरिक आता सीएनजीतील दरवाढ आता अजिबात सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना याप्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली आहे, असे मुंबई ऑटोरिक्षा चालक संघटनेचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

दरवाढीनंतर मुंबईतील दर
मुंबईत आणि लगतच्या परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर प्रतिकिलो ६६ रुपये, तर पीएनजीचा दर युनिटसाठी ३९.५० रुपये इतका असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 5 =

Close