सीईटी परीक्षा लांबणीवर

Read Time:2 Minute, 54 Second

मुंबई : जेईई आणि नीट या दोन परीक्षा एकाच वेळी आल्या आहेत. याचा विचार करून महाराष्­ट्र सामायिक प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी पुढे ढकलण्­यात आली आहे, अशी माहिती उच्­च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ट्­विटच्­या माध्­यमातून दिली. आता सीईटी परीक्षा ऑगस्­टच्­या पहिल्­या आठवड्यात होईल. याची तारीख लवकरच जाहीर करण्­यात येईल, असेही त्­यांनी स्­पष्­ट केले. त्यामुळे आता एमएचटी-सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

एमएचटी सीईटी २०२२ ही परीक्षा ११ जून ते १६ जून दरम्यान होणार होती. पण जेईई मेन २०२२ ही परीक्षादेखील जूनमध्येच सुरू होणार आहे. त्याचबरोबर १७ जुलैपासून नीट परीक्षा होणार आहे. या दोन परीक्षांमुळे एमएचटी सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे. नीट परीक्षा पार पडल्यानंतर एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबतच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाहीत. पण लवकरच तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.

काही दिवसांपूर्वी जेईई मेन्स २०२२ परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. याच काळात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटही होत आहे. त्­यामुळे एमएचटी सीईटी २०२२ परीक्षा पुढे ढकलण्­याचा निर्णय घेण्­यात आल्­याचेही त्­यांनी म्­हटले. जेईई आणि नीट परीक्षांमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होईल. या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही त्­यांनी स्­पष्­ट केले.

विद्यार्थ्यांना दिलासा
सीईटी परीक्षेच्­या तारखेमध्­ये बदल झाल्­याची अफवा पसरत होती. त्­यामुळे उच्­च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा पुढे ढकलण्­यात आल्­याचे ट्­टिवरच्या माध्­यमातून सांगितले. जेईई, नीट आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी असू नयेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती. त्­यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्­यात आल्­याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 4 =