सीईओ मीनल करनवाल यांनी मतदार जागृतीसाठी बारड येथील कन्या शाळेस दिली भेट


नांदेड:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा बारड येथे भेट दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनीना व शिक्षकांना मतदार जनजागृती विषयी माहिती विचारली. कु. वैष्णवी कदम व शिक्षिका हंबर्डे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच सीईओ मीनल करनवाल यांनी मुलींना मतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे त्यांनी अभिनंदन केले. शाळेचे काम पाहून समाधान व्यक्त केले.


Post Views: 41






Share this article:
Previous Post: 11 एप्रिल रोजी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार – VastavNEWSLive.com

April 10, 2024 - In Uncategorized

Next Post: नांदेड लोकसभा उमेदवारांची 12 एप्रिलला प्रथम खर्च तपासणी; उमेदवारांना उपस्थिती अनिवार्य

April 10, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.