सिसोदियांच्या घरावर सीबीआयच्या छापेमारीनंतर आप-भाजप आमनेसामने

Read Time:3 Minute, 4 Second

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मनीष सिसोदिया यांच्या घरावरील सीबीआयच्या छापेमारीली राजकीय षडयंत्र म्हटले आहे. मद्य धोरण तपासणे हा त्याचा उद्देश नसून अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियतेला आळा घालणार हा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींचा खरा चेहरा समोर आला असून भाजपच्या दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलवर ते नाराज आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, अमेरिकेतील वर्तमानपत्रही सिसोदियाचे कौतुक करतात. नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे नाही, तर त्यांना विरोधकांना त्रास द्यायचा आहे. भाजपचे भ्रष्टाचारी देशभर फिरत आहेत. नेहमी दुस-या पक्षावर सीबीआयचे छापे पडतात, कारण सीबीआयची कारवाई ही भाजपची निराशा आणि संतापाचा परिणाम असल्याचे ते म्हणाले आहते. ते पुढे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत भाजपला एकच चिंता आहे की केजरीवाल यांना रोखायचे कसे, पण आता मुख्यमंत्री केजरीवाल यांना कोणीही रोखू शकणार नाही. शिक्षणमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान हे सर्व चिडून करत आहेत. केजरीवाल यांची लोकप्रियता रोखणे हा सीबीआय छाप्यांमागील हेतू असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर कथित भ्रष्टाचार प्रकरणी निशाणा साधला आहे. एखाद्या भ्रष्ट व्यक्तीने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो भ्रष्टच राहील. तुमच्या विरोधात भ्रष्टाचाराची ही पहिलीच घटना नाही. दिल्लीतील दारूच्या दुकानांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे ते म्हणाले.

सीबीआय चौकशीचे आदेश दिले त्याच दिवशी दिल्लीचे दारू धोरण मागे घेण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंर्त्यांनी केला. जर दारू धोरणात घोटाळा झाला नसेल तर ते मागे का घेतले? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − four =