सिलिंडरच्या स्फोटाने आग; २ लाखांची रोकड जळून खाक

Read Time:1 Minute, 45 Second

औरंगाबाद : शहरातील कामगार चौक, एन-३ येथील कैलास अपार्टमेंट येथील पहारेक-यांच्या घराला आग लागल्याने दोन एल. पी. जी. गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या आगीत सुदैवाने कुणी जखमी झाले नाही, मात्र किडनीच्या आजाराच्या उपचारासाठी आणलेले दोन लाख रुपये जळून खाक झाले.

राजू शामराव चव्हाण (३२) हे कैलास आपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक आहेत. गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत रोख दोन लाख रुपयांसह घरातील संसारोपयोगी वस्तूही भस्मसात झाल्या. चव्हाण हे किडणीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्या उपचारासाठी त्यांनी ही रक्कम जमा करुन ठेवली होती अशी त्यांनी पोलिसांना माहिती दिल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव खटाने यांनी सांगीतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी शरद घाटेशाही, अब्दुल अजीज, हरिभाऊ घुगे, शेख समीर, मोहम्मद मुजफ्फर, वाहनचालक शेख रशीद आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + twelve =