सिलिंडरचे वजन कमी करणार?

Read Time:2 Minute, 41 Second

नवी दिल्ली : एकीकडे कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या वजनात घट करण्याचा सरकारचा मनोदय असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. सध्याच्या १४.२ किलो वजनाच्या सिल्ािंडरची वाहतूक करताना महिलांना येणा-या अडचणी लक्षात घेऊन त्याचे वजन कमी करण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे, असे पुरी यांनी सांगितले.

सध्याचे एलपीजी सिल्ािंडर जड असल्याने ते एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेणे कठीण होते. विशेषत: महिलांना खूप त्रास होतो. वास्तविक लोकांच्या सोयीसाठी गॅस सिल्ािंडर हलका असणे आवश्यक आहे, त्यामुळे गॅस सिलिंडरचे वजन कमी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. ती पूर्ण होण्याची चिन्हे दिसत असताना गॅसचा दर कमी होणार का? असा सवाल विचारला जात आहे. सध्या तीव्र महागाईचा सामना जनता करत असताना पेट्रोल-डिझेल व गॅस दरात घट करुन केंद्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

इंधन दर जीएसटी कक्षेत आणण्याची योजना नाही
पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात केंद्र सरकारने कपात केली असली, तरी अजूनही पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वरच आहेत. त्यामुळे सामान्य माणूस महागाईच्या झळीत होरपळून जात आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेलचे दर कमी व्हावेत किंवा देशात सर्वत्र दर सारखेच असावेत, अशी मागणी लावून धरण्यात येत आहे. यासंदर्भात आज राज्यसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी इंधनाला जीएसटीमध्ये आणण्याचा आणि संपूर्ण देशात एकच दर करण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − 10 =