सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पुणे कनेक्शन  

Read Time:3 Minute, 10 Second

पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले. गायकाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. आता या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे ८ आरोपींमध्ये पुण्याच्या सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांची नावे आहेत. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बाणखेले खून प्रकरणातील मोक्काचे फरार आरोपी आहेत.

दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार आहेत. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती. संतोष जाधव हाच आरोपी असू शकतो, त्यावरून आज पंजाब पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली. गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गँगने महाराष्ट्र राज्यातून दोन शार्प शूटर बोलावले होते. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर होते. ज्यांनी मुसेवालावर गोळीबार केलाय यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली आहेत.

मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता.

पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज पाहून संतोष जाधवबद्दलची माहिती दिली होती. संतोष जाधव हा मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे ग्रामीण पोलीस संतोष जाधवच्या शोधात आहे. सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन , असे स्टेटस संतोष जाधव यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्याला प्रत्युत्तर देताना ओंकारने संतोष जाधव यांना भेटून मारहाण करणार असल्याचे लिहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 − seventeen =