सिडको येथील इनरिच स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत


नवीन नांदेड (प्रतिनिधी): हडको येथील वत्सल्य नगर भागातील enrich a play school व प्रबोध विद्यामंदिर ह्या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दिनांक 13 जून 2024 रोजी शाळेची वर्षाची सुरुवात माता सरस्वती च्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आले पहिल्या सत्रात शाळेत मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ व विविध देखाव्यासह करण्यात आले , यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली कृष्णा किंगरे यांनी  सरस्वती पूजन  व मुलांचा अक्षर अभ्यास करून  शाळेत स्वागत केले. शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले.मुलांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहण्यात आले,

तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग आणि पाणी बॉटल देण्यात आली हा उपक्रम राबवण्यासाठी सौं.लक्ष्मी महाजन, अर्चना केन्द्रे , रोहिणी जहागीरदार प्रचिती कुलकर्णी, दीपिका वाखरडकर, सुरेखा कोल्हे, कोमल तरंगे, व सुमेध बदरगे, आणि  वंदना ताई व शांतताई यांनी परिश्रम घेतले.Share this article:
Previous Post: 315 पोलीस अंमलदारांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पोलीस अधिक्षक कार्यालयात समुपदेशन होणार

June 13, 2024 - In Uncategorized

Next Post: वंचितकडून नांदेड उत्तरसाठी प्रा.राजू सोनसळे यांची तयारी

June 14, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.