सा.बां.कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक करणार आत्मदहन


नांदेड(प्रतिनिधी)-जूना कौठा भागातील विकासनगर या गृहनिर्माण सोसायटीमध्ये शासकीय काम करणाऱ्या गुत्तेदारांवर योग्य कार्यवाही झाली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पत्र सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम शंकरराव वरपडे यांनी दिले आहे.
कौठा भागात विकासनगर गृहनिर्माण सोसायटी आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल उत्तम वरपडे यांनी तक्रार केली होती. विशेष म्हणजे या भागात काम करणारा कंत्राटदार काळ्या यादीतील आहे. तरीपण त्याने केलेल्या चुकीच्या कामांवर काहीच कार्यवाही होत नाही त्याचे कारण आर्थिक फायदा आहे असे उत्तम वरपडे यांनी आपल्या अर्जात लिहिले आहे. उत्तम वरपडे यांनी अभियंते नरबटवार, दुबे यांच्याकडे सुध्दा तक्रार केली होती. त्यांनी कार्यवाही करण्याचे आश्र्वासन दिले मात्र काहीच कार्यवाही केलेली नाही. तेथे सुरू असलेल्या रस्त्यांच्याकामांनी माझे नळ तोडले गेले, ड्रेनेज फुटले, माझ्या घरासमोर पाणी जमा होत आहे. त्वरीत प्रभावाने विकासनगरमध्ये काम करणाऱ्या बोगस गुत्तेदारावर कार्यवाही केली नाही तर मी आपल्या कार्यालयासमोर अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे असा इशारा सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम शंकरराव वरपडे यांनी दिला आहे.


Post Views: 5


Share this article:
Previous Post: नीटच्या विरोधात नांदेड विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा; हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर

June 14, 2024 - In Uncategorized

Next Post: किनवटमध्ये हिरो शोरुम फोडले – VastavNEWSLive.com

June 14, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.