August 19, 2022

सावधान! यंदाचा उन्हाळा असणार कडक

Read Time:3 Minute, 0 Second

नवी दिल्ली: हिवाळा संपून आता उन्हाळ्याचे वेध लागले आहेत. सर्वच भागांत उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने देशात यंदाचा उन्हाळा कडक असण्याचा इशारा दिला आहे. पश्चिम-मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याचा अंदाज आहे. केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात मार्च महिन्यात रात्रीच्या वेळी उष्मा जाणवेल.

भारतात मार्चमध्ये फारसा पाऊस पडत नाही. त्यामुळे या महिन्यात देशभरातील एकूण पाऊस सामान्य असेल, अशी माहिती आयएमडीच्या अधिका-यांनी दिली आहे. भारतात उन्हाळा अधिकृतपणे साधारण मार्चमध्ये सुरू होतो. जूनच्या मध्यापर्यंत किंवा मान्सूनचा पाऊस उत्तर आणि वायव्य भारतातील प्रदेशात पोहोचेपर्यंत उन्हाळा असतो. मार्चमध्ये ऋतू संक्रमणादरम्यान दक्षिण ओडिशा आणि मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हवामान उष्ण राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. या भागात मार्च महिन्यात काहीसा उष्मा जाणवेल, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले आहे. तसेच केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागांत मार्च महिन्यात रात्रीच्यावेळी उष्मा जाणवेल.

भारतात मार्चमध्ये फारसा पाऊस पडत नाही.त्यामुळे या महिन्यात देशभरातील एकूण पाऊस सामान्य असेल, असेही सांगितले आहे. आयएमडीने जाहीर केलेल्या मार्च ते मेदरम्यानच्या हवामान अंदाजानुसार, दक्षिणी द्विपकल्प, मध्य भारत, उत्तर मैदानी प्रदेश, पूर्व आणि ईशान्य भारतात आगामी उन्हाळ्यात उष्णतेची स्थिती सामान्य असेल तसेच कमी तीव्रतेच्या उष्णतेच्या लाटा येण्याचीही शक्यता आहे. नेहमीच्या तापमानापेक्षा ४.५ अंशांनी अधिक तापमानाची नोंद झाल्यास त्याला उष्णतेची लाट म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 − 5 =

Close