सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!

Read Time:2 Minute, 35 Second

मुंबई |  सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोळे यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात आणण्यात आलं. या दोघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांचंही शवविच्छेदन करण्यात आलं.

जेजे रुग्णालय प्रशासनाने सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोळे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कासा पोलीस स्टेशनला पाठवला आहे.

सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक परदेशात राहतात, ते आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचतील. त्यामुळे सायरस यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

पोलिसांनी या अपघाताप्रकरणी मोठे खुलासे केले आहेत. या गाडीमधील दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, असं एका पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानंतर सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, गाडी अतिशय वेगात होती, त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा. या गाडीने अपघात झाला त्यावेळी अवघ्या 9 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर अंतर पार केलं होतं. यावरुन गाडीच्या स्पीडचा अंदाज लावता येतो.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) त्यांच्या महागड्या मर्सिडीज कारने प्रवास करत होते. कारमध्ये ड्रायव्हरसह तीन जण असे एकूण चार जण होते. यामध्ये स्वत: सायरस मिस्त्री, जहांगीर दिनशा पंडोले, अनायता पंडोले, दरीयस पांडोले यांचा समावेश होता. अपघातात सायसर मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर तीनही जण गंभीर जखमी झाले होते.

सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) हे व्यावसायिक जगतात सामान्य नाव नाही. ते प्रसिद्ध भारतीय वंशाचे खरबापती पलोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + one =