साथरोगात राजकारण करू नये-राजेश टोपे

Read Time:2 Minute, 45 Second

जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजपच्या रेल्वे प्रवासासाठीच्या मागणीवर आणि त्यासाठी करण्यात येणा-या आंदोलनावर टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सांगितलेय ‘जान है तो जहान है’. त्यामुळे या महामारीत भाजपने राजकारण करू नये, असे म्हणत राजेश टोपे यांनी भाजपला टोला लगावला. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, ‘‘दोन डोस घेतलेल्यांना लोकलप्रवासाची मुभा द्यावी या मागणीसाठी भाजपने रेल्वे आंदोलन केले. मात्र कुणालाही त्रास द्यायची आम्हाला हाऊस नाहीये, तर सर्व निर्णय हे टास्क फोर्सच्या शिफारशीनुसार घेतले जातात. त्यामुळे भाजपने कायदा हातात घेऊ नये. योग्य नियोजन केल्यानंतरच लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू केली जाईल.’’

‘जान है तो जहान है’ असे मोदींनी देखील सांगितलेय
‘‘महामारीत भाजपने राजकारण करू नये. मोदींनी देखील ‘जान है तो जहान है’ असे सांगितलेय. भाजपच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये. दोन लस घेतलेल्यांना लोकल प्रवासावर विचार सुरू आहे. योग्य नियोजन केल्यानंतरच लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू जाईल,’’ असेही टोपे यांनी सांगितले.

‘‘केंद्राने कोरोना लसी वाढवून द्याव्यात’’
राजेश टोपे म्हणाले, ‘‘लस तुटवड्याअभावी लसीकरणाची गती मंदावली. केंद्राने आणखी लस वाढवून द्यावी. भाजपच्या नेत्यांनाही मी विनंती केली. फडणवीस यांनाही बोललो आहे, की केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटून राज्यासाठी लस वाढवून मागा. सांगली, सातारा या पूरग्रस्त भागात कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो. त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेला अलर्ट होण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर प्रभावित भागात लसींचा जास्त साठा पाठवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty + seventeen =