
सहस्रकुंड धबधब्याने केले रौद्ररुप धारण
ईस्लापुर : सहस्रकुंड धबधब्याने रौद्ररुप धारण केले असुन कुंडाच्या दोन्ही धार एक झाल्याने पावसातही धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची चांगली गर्दी वाढली आहे.
मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर निर्सगाच्या खुशीत वाहणारा सहस्रकुंड धबधबा उन्हाळयाच्या शेवटी शेवटी पुर्णत कोरडाठाक पडला होता. जुन महिण्यात झालेल्या चार ते पाच पावसामुळे धबधब्यात चांगलेच पाणी आले असुन कुंडाची धार दोन्ही बाजुनी सुरु झाली होती.
दि. ७ जुलै गुरुवारच्या रात्री पासुन परिसरात मुसळधार पावसाने या भागात झड लावली असल्याने या धबधब्याच्या पाणी पातळीत वाढ होवुन कुंडाच्या दोन्ही धार एक झाल्या आहेत. तर या धारा व थंड लाटेचा आनंद घेण्यासाठी मुसळधार पावसातही पर्यटकाने धबधब्यावर मोठी गर्दी केली आहे.
किनवट तालुक्यातील निर्सगमय परिसर म्हणुन सहस्रकुंड धबधबा परिचीत आहे.या परिसरात वनविभागाचा मोठा बगीचा आहे.हा संकुलन केंद्राचा बगीचा पाहण्या सारखा असुन संपुर्ण बगीचा झाडे,विवीध प्रकारची फुले,वेलांनी बहरुन गेला आहे.हे दूष्य पर्यटकांना आकर्षित करणारे आहे.
सहस्रकुंड धबधबा परिसराचे सौदर्य पावसाने खुलले आहे.नेहमी पावसाळयात खळवळुन वाहणारा हा धबधबा गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसंडुन वाहत आहे.
पावसाने प्रचंड मोठया प्रमाणात पाणी पातळी वाढल्याने परिसरातील नदि, नाले, तलाव, ढव, बंधारे हे खचाखच भरले आहे. सहस्रकुंड धबधब्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.हा धबधबा पावसामुळे भरभरुन वाहत असल्याने मराठवाडा व विदर्भाच्या बाजुने हौसी पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येत आहे. वाढत्या पाण्यामुळे व पर्यटकाची गर्दी होवु नये म्हणुन मराठवाडा व विदर्भ दोन्ही बाजुने पोलीसांनी बंदोबस्त ठेवला आहे.