सर्वोत्कृष्ट गणेश मंडळाला ५ लाखांचा पुरस्कार; सरकारची घोषणा

Read Time:2 Minute, 17 Second

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनाकडून विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी अर्ज करण्याची मुदत ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत होती ती वाढवून आता २ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

या पुरस्कारांनुसार स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणा-या मंडळाला ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार तर तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचे परितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्हावार प्रथम येणा-या मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

स्पर्धेचे नियम काय आहेत?
१) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक.

२) किंवा स्थानिक पोलिस ठाणे अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी असणे आवश्यक.

३) स्पर्धेत सहभागासाठी www.pldeshpandekalaacademy.org या वेबसाईटवर What is news या सेक्शनमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

४) हे अर्ज [email protected]या ई-मेलवर २ सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत

५) मंडळांची निवड जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − three =