सर्वपक्षीय नेत्यांची आरोपांची राळ..! लोकांची ईच्छा दोषींवर कारवाई झाली पाहिजे…!

Read Time:5 Minute, 1 Second

 

मागच्या आठवडाभर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते एकमेकांवर अनेक आरोप करताहेत. राज्यसभा खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपमधील साडे तीन नेते जेल मध्ये जाणार ! त्यांच्याविषयीची माहिती मी उद्या पत्रकार परिषदेत सांगणार असे माध्यमांसमोर मोठ्या ताकदीने व आत्मविश्वासाने बोलले. दुसऱ्या दिवशी मराठी प्रसारमध्यांनी संजय राऊतांच्या अर्थात शिवसेनेच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेला जोरदार कव्हरेज दिलं.

संजय राऊत भाजपच्या नेत्यांवर टीका करताना आम्ही कोणाला घाबरणार नाही असे संदेश दिला. त्यांनी किरीट सोमैय्या यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर अर्थत निल सोमैय्या वर कडाडून टीका केली. किरीट सोमैय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी वधावान कुटुंबाची ‘निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर’ या उद्योगात भागीदारी आहे असा आरोप केला, पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या काळात महा आयटी विभागात २५ हजार कोटींची घोटाळा झाला आणि त्यात अमोल काळे व विजय ढवंगाळे सूत्रधार आहेत आणि त्यांना आता भाजप पळवून लावलं आहे.

या आरोपांना उत्तर द्यायला अमोल काळे स्वतः एक पत्रक काढून त्यात लिहिलं, ‘मी एक खाजगी व्यवसायीक आहे, व मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. मी कोणतेही शासकीय कंत्राट घेतले नाहीत त्यामुळे माझ्यावर होत असलेले आरोप निराधार व माझी बदनामी करणारे आहे मी यावर कायदेशीर कारवाईची सुरुवात केली आहे.’ भाजपचे आमदार व तत्कालीन महा आयटी मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या ५ वर्षाच्या काळात महा आयटी विभागाला एकूण ११०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे तर मग २५ कोटी रुपयांचा घोटाळा कसा होणार याविषयीचे तथ्य त्यांनी बाहेर आणलं आहेत.

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी मुख्यमंत्री कुटुंबियांचे अर्थात रश्मी ठाकरेंचे कोर्लई गावात १९ बंगले आहेत. त्या घरांना नावावर करून घेण्यासाठी रश्मी ठाकरेंनी ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं आहे, ग्रामपंचायतीत याविषयी ठराव मंजूर झाले आहेत, त्या बंगल्याचे रश्मी ठाकरेंनी कर सुद्धा भरला आहे असा आरोप केला होता त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले त्या गावात कोणतेही १९ बंगलेच नाहीत सोमैय्या खोटे बोलत आहेत, मी तिथे तुम्हा सगळ्या पत्रकारांना घेऊन जातो जर तिथे बंगले नसतील तर मी सोमैय्याला जोडे मरेन.

दुसऱ्या दिवशी सोमैय्या यांनी रश्मी ठाकरेंनी त्या बंगल्याचे कर भरलेले पुरावे आहेत असे माध्यमांत बोलले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. केंद्र रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा संजय राऊत व राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भाजपचे युवा नेते, व्यवसायिक मोहित कुंभोज हे देवेंद्र फडणवीस यांची ब्ल्यू आईड बॉय आहेत त्यांनीही जमीन खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता त्यावर मोहित कुंभोज यांनीही संजय राऊतांच्या सर्व आरोपांना खोडुन काढले आहे. असे नानाविध आरोप सर्वपक्षीय नेते एकमेकांवर करत आहेत. यातून माध्यमांना टीआरपी आणि लोकांना निखळ मनोरंजन मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × four =