January 19, 2022

सरकार शेतक-यांमध्ये फूट पाडतेय

Read Time:2 Minute, 55 Second

लखनौ: भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकार शेतक-यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. सरकारने शेतक-यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवावे, अन्यथा आम्ही कुठेच जाणार नाही (आंदोलन सुरू ठेवणार), असे म्हटले आहे. शेतकरी नेत्याने असेही म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी देणा-या कायद्याच्या मागणीचे स्पष्ट उत्तर द्यावे, ज्याचे त्यांनी मुख्यमंत्री असताना समर्थन केले होते. त्यांनी कृषी कायद्यांचे समर्थन करणा-या कृषि तज्ज्ञांवर ट्विट करून टोला लगावला. ‘सरकारी नोकर तज्ज्ञ बनतात’, असे त्यांनी ट्विट केले.

किसान महापंचायतीला संबोधित करताना टिकैत म्हणाले, ‘त्यांना पटवून देण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागले, आम्ही आमच्याच भाषेत बोललो, पण दिल्लीतील चकचकीत खोल्यांमध्ये बसणा-यांची भाषा वेगळी होती. हे कायदे शेतकरी, गरीब आणि दुकानदारांचे नुकसान करणारे आहेत हे समजायला जे आमच्याशी बोलायला आले त्यांना १२ महिने लागले. त्यानंतर त्यांनी कायदे मागे घेतले. त्यांनी कायदे मागे घेऊन योग्य केले, पण काही लोकांना कायद्यांबाबत पटवून देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगून शेतक-यांंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

आमचा संघर्ष सुरूच राहील
शेतकरी नेते म्हणाले, ‘पंतप्रधान देशासमोर माफी मागू शकतात, पण देशासमोर माफी मागून शेतक-यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. एमएसपीची हमी देण्यासाठी कायदा केल्यास त्यांना वाजवी दर मिळतील. देशातील जनता आता जागरूक झाली आहे. केंद्रावर हल्ला करताना टिकैत म्हणाले, संपूर्ण देश खाजगी ‘मंडी’ (बाजार) बनणार आहे असे दिसते. आमचा संघर्ष सुरूच राहील. आम्ही ‘संघर्ष विश्राम’ची घोषणा केली नाही. सरकारनेच ‘संघर्ष विश्राम’ घोषित केला. आमच्याकडे इतर अनेक समस्या असल्याने आम्ही ऑफर नाकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − 1 =

Close