सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 3 लाखांपर्यंत मिळू शकतो पगार

Read Time:1 Minute, 44 Second

नवी दिल्ली | सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्याच लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या पोस्ट विभागाअंतर्गत इंडिया पोस्ट पेेेेेेेेमेंट्स बॅकेने विविध व्यवस्थापकीय पदाच्या (Managerial positions) भरतीसाठीची जाहिरात समोर आली आहे.

अनेक वेगवेगळ्या पदासाठी जागा निघल्या आहेत. टेक्नोलाॅजी (Technology), प्रोडक्ट, ऑपरेशन्स, रिस्क मॅनेजमेंट ही पदं भरली जाणार आहेत. चीफ काॅम्प्लायन्स ऑफिसर (Chief Compliance Officer) आणि इंटर्नल ऑम्बुड्समॅन या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. तुमच्या श्रेणीनुसार तुम्हाला पगार मिळणार आहे. महिन्याला तुम्ही 3 लाखापर्यंत पगार मिळवू शकता.

यासंबधीची माहिती IPPB च्या अधिकृत बेवसाईटवर (Official website) उपलब्ध आहे. तसेच यासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही ippbonine.com यावरुन भरती विभागातून अधिकृत अधिसूचना डाउनलोड करू शकता. तसेच ऑनलाईन अर्ज देखील करु शकता.

दरम्यान, अर्ज करण्याची तारीख 10 सप्टेंबर रोजी सुरु झाली आहे. तर अर्ज (application) करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेचच अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 1 =