सरकारकडून तरुणांना 3400 रुपये मिळणार?, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल

Read Time:2 Minute, 8 Secondनवी दिल्ली | हल्ली सोशल मिडियाच्या (Social Media) वाढत्या वापरामुळे अनेक गोष्टींचा तोटा निर्माण झाला आहे. हल्ली सोशल मिडियावरून ब्लॅकमेल करणं ,पैसे उकळणं आणि खोेटे मॅसेज फाॅरवर्ड, व्हायरल मॅसेजकरुन बॅंक डिटेल्स घेणं असे प्रकार केले जातात.

सरकार नेहमी अनेक योजना आणत असतं. अनेकांना त्या योजनेचा फायदा होते. मात्र अशा योजनेचा उपयोग आता पैसे उकळण्यासाठी केला जात आहे. नुकताच सरकारने प्रधानमंत्री ज्ञानवर्नी योजनेअंतर्गत तरुणांच्या खात्यात 3400 रुपये जमा होत आहेत. त्यामुळे सर्व माहितीचा अर्ज (Form) लवकरात लवकर भरा असा मॅसेज व्हायरल केला जात आहे.

मात्र हा मॅसेज खोटा असल्याचा खुलासा झाला आहे. यासंबधीचं वृत्त भारत सरकारने त्यांच्या अधिकृत ट्विटर (pib fact cheak) हँडलवरुन देण्यात आला आहे. अशी कोणतीही योजना सरकार आणली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अशा मॅसेजला बळी पडू नका, असं आवाहन केलं आहे.

तुम्हालाही असा मॅसेज (Message) आला असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करा. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.Leave a Reply

Your email address will not be published.

1 × one =