August 19, 2022

सबसिडी बंद, ११,६५४ कोटींची बचत!

Read Time:3 Minute, 59 Second

गॅस सबसिडी शून्यावर, मोदी सरकारने या अगोदरच बंद केली सिलिंडर सबसिडी, ग्राहकांत नाराजी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी अर्थात अनुदान आता जवळपास बंद केले आहे. अनुदान बंद केल्याने सरकारच्या तिजोरीतील ११,६५४ कोटी रुपयांची बचत केली झाले. २०२०-२१ मध्ये केंद्र सरकारने एलपीजी अनुदान म्हणून ११,८९६ कोटी रुपये खर्च केले होते, तर २०२१-२२ मध्ये हा खर्च केवळ २४२ कोटींवर आलेला आहे. शासनाने हे अनुदान काढून टाकल्याने एका आर्थिक वर्षात तब्बल ११,६५४ कोटींची बचत केली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २००७-८ या आर्थिक वर्षात एलपीजी सबसिडीवर २३,४६४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. जे २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३७,२०९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यानंतर सरकारने नागरिकांना एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. या आवाहनावर कोट्यवधी ग्राहकांनी सबसिडी सोडली. त्यामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात सरकारचा खर्च २४,१७२ कोटींवर आला. २०२०-२१ मध्ये त्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. अनुदानाचा खर्च ११,८९६ कोटी रुपयांवर आला. त्यानंतर २०२१-२२ मध्ये हा खर्च केवळ २४२ कोटींवर आला आहे.

मोदी सरकारअगोदर सिलेंडर सबसिडीसह साडेचारशे रुपयांत मिळत होते. केंद्र सरकार अनुदानाची रक्कम गॅस कंपन्यांना देत होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात थेट कंपन्यांना सबसिडी न देता सिलिंडरची मूळ किंमत ग्राहकांकडून घेऊन सबसिडी बँक खात्यात जमा करण्याची पद्धती अवलंबली. त्यातच मोदी सरकारने हळूहळू ही सबसिडीच बंद करण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास सर्वच सबसिडी बंद झाल्यात जमा आहे. अनेकांना सध्या केवळ ८ रुपये सबसिडी मिळते. त्यामुळे ग्राहकांत नाराजी आहे.

उज्ज्वला योजनेला
जून २०२० पासून अनुदान ​​​

केंद्र सरकारने जून २०२० मध्ये गॅस सिलिंडरवर सबसिडी फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सबसिडी घेणा-या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली. सरकारने एका वर्षात १२ रिफिलसाठी एलपीजी लाभार्थ्यांसाठी प्रतिसिलिंडर २०० रुपये सबसिडी सुरू केली आहे. सिलिंडरवरील अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

एका वर्षात सिलिंडर
२१८ रुपयांनी महागले
२३ जुलै २०२१ रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८३४.५० रुपये होती. जी आता १०५३ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २१८.५० रुपयांची वाढ झाली. यावरील अनुदानही रद्द करण्यात आले, तर देशभरातील ३० कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत ९ कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शनचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

15 − ten =

Close