सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता, यलो अलर्टही जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी दिवसभर उकाडा जाणवत आहे आणि रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. हे हवामानातील होत असलेले बदल स्पष्ट जाणवत असतानाच काही राज्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दिल्लीत 3 जानेवारी पर्यंत तापमान 4 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही स्थिती 6 जानेवारी पर्यंत कायम राहू शकते, असा अंदाज आहे. म्हणूनच इथं 6 जानेवारी पर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
दिल्लीसह उत्तर-पश्चिम भारतात ही थंडीची लाट कायम असणार आहे. म्हणजेच हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, या राज्यांत कडाक्याची थंडी पडू शकते, असा हवामान खात्याचा अंदाज(Meteorology Department) आहे.
दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बनमुळे हवामानात मोठे बदल होत तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी थंडी वाढल्य़ाचे दिसून येत आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत भारतातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळं थंड वारे वाहतील आणि परिणामी देशातील काही भागांत थंडी वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या-