
सतर्क! झिका व्हायरसचा आणखी एक रूग्ण
नवी दिल्ली | गेली काही वर्षे जगभरात कोरोनानं थैमान घातलं होतं. कोरोनाच्या(Corona) संकटातून आता कुठं देश सावरत असतानाच आणखी एका नव्या व्हायरसनं तोंड वर काढलं आहे. त्यामुळं देशभरात चिंतेचं सावट पसरलं आहे.
आता कर्नाटक राज्यात एका पाच वर्षाच्या मुलीला झिकाची(Zika Virus) लागण झाली आहे. 5 डिसेंबर रोजी झिका व्हायरसच्या चाचणीसाठी तीन सॅंपल पुण्यामध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक रिपोर्ट पाॅजिटीव्ह आला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिली आहे.
कर्नाटकातही झिकाचा रूग्ण आढळल्यानं तेथील जनतेमध्येही भिती पसरली आहे. त्यामुळं सर्वांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.
सरकार नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन योग्य ते पाऊल उचलेल. तसेच लवकरच नव्या गाईडलाईन जाहीर केल्या जातील, त्यामुळं नागरिकांनी भिती बाळगण्याची गरज नाही, असंही के. सुधाकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, झिका हा व्हायरस एडीस डासांमुळं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. झिका संसर्गामुळं जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळं या व्हायरसची बाधा झाल्यास लवकरात लवकर उपचार घेणं आवश्यक आहे.
सांदेदुखी,पायदुखी, डोकेदुखी ही झिका व्हायरसची लक्षणं आहेत. कधीकधी व्हायरसची लागण झाल्यानंतर लवकर लक्षणही दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या-
More Stories
अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण
[ad_1] मुबंई | 1969 साली ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून अभिनेत्री रेखाने (Rekha) चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आज 66 व्या वर्षीदेखील रेखा...
भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे....
ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?
[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी...
चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण
[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8...
‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज
[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी...