‘सगळे सिनेमे सारखेच’, ब्रम्हास्त्र प्रदर्शित होताच ऋषी कपूर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Read Time:3 Minute, 23 Secondमुंबई । बॉलिवूडचे सुपरहिट अभिनेते ऋषी कपूर (Rushi Kapoor) आज आपल्यामध्ये नाहीत. परंतु त्यांचा दमदार अभिनय असणाऱ्या चित्रपटांतून ते नेहमीच आपल्या आठवणीत राहिले आहेत.

त्यांच्याशी संबंधित अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसाच एक व्हिडीओ अलीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर हिंदी सिनेमांबद्दल बोलताना दिसत आहेत. ऋषी कपूर यांचा हा व्हडिओ ‘आ अब लौट चले’ या सिनेमाचे दिग्दर्शन करत असतानाचा आहे.  ते म्हणत आहेत की, ‘सगळेच हिंदी सिनेमे एकसारखेच असतात.’ ऋषी कपूर यांचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होतोय.

व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, ‘सिनेमामध्ये तुम्ही कोणती भुमिका करणार हा प्रश्न मला विचारू नका. मी कोणती भुमिका केलीय? असं म्हणत बऱ्याच वेळा आम्ही स्वत: वर हसतो. कोणताही अभिनेता सिनेमाच्या कथानकाविषयी किंवा त्याच्या भुमिकेबद्दल सांगतो की ही भुमिका आणि हा सिनेमा इतरांपेक्षा वेगळा आहे. पण त्यात नेमकं काय वेगळं आहे हे त्यांनाच माहिती नसतं.’

ऋषी कपूर पुढे असंही म्हणतात की, ‘भुमिकांमध्ये फरक असु शकतो मात्र सगळे सिनेमे हे सारखेच असतात. आपले सिनेमे वेगळे बनत नाहीत कारण आपल्याकडे फक्त रोमॅंटिक स्टोरी घेऊनच सिनेमे बनवले जातात. तुम्ही त्यात पोलिस, डॉक्टर, वकिल, बिजनेसमन यापैकी कोणाचीही भुमिका करा. पण सिनेमातील गाण्यात तुम्ही नाचताना दिसणारच. मग कशाला बोलायचं वेगळी भुमिका किंवा सिनेमा आहे.’

या वर्षी बॉलिवूडला ग्रहण लागल्याचं चित्र पहायला मिळत होतं. कारण अनेक बिग बजेट सिनेमे फ्लॉप ठरले. परंतु अशातच ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि सुन आलिया भट्ट यांचा “Bramhastra” हा सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळतंय. आयान मुखर्जी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

ब्रम्हास्त्र हा सिनेमा चालणार की नाही यावरुन सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर गदारोळ माजल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र आता बॉक्स ऑफिसवर ज्या पद्धतीने ब्रम्हास्त्रची कमाई सुरू आहे त्यावरून तरी अंदाज येतोय की सिनेमाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.Leave a Reply

Your email address will not be published.

5 × 3 =