
संसर्गाची उतरणीकडे वाटचाल…
मराठवाड्यातील जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद या ६ जिल्ह्यात शुक्रवारी ४५६२ नवे रुग्ण आढळले. तर ४९१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्या ९० पर्यंत आहे. शुक्रवारी नव्या संसर्गाचा दरही कमी होता. तसेच नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. एकुणच शुक्रवारी कोरोनाचा उद्रेक ब-याचा प्रमाणात मंदावल्याचे दिसून आले.शुक्रवारी लातूर जिल्ह्यात ९५८ नवे रुग्ण तर ३० मृत्यू झाले.
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी गुरुवारपेक्षा ८० जास्त म्हणजे २७७ नवे रुग्ण आढळले. तसेच गुरुवारपेक्षा २४ जास्त म्हणजे २४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृृत्यू संख्येतही गुरुवारपेक्षा एकाने घट होत ५ रुग्णांचा मृृत्यू झाला. एकुणच जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग ब-यापैकी स्थिर होता. जालना जिल्ह्यात शुक्रवारी साधारण गुरुवारएवढेच ६८३ नवे रुग्ण आढळले. तसेच गुरुवारपेक्षा २५० जास्त म्हणजे ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी गुरुवारपेक्षा २ जास्त म्हणजे १० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली.
उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारपेक्षा ११० जास्त म्हणजे ९०० नवे रुग्ण आढळले. तसेच गुरुवारपेक्षा २५ अधिक म्हणजे ६७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शुक्रवारी कालपेक्षा एक जास्त म्हणजे १९ रुग्णांचा मृत्यू झाला. एकंदरीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गात किंचित वाढ दिसून आली.
नांदेड, परभणीत रुग्णसंख्येत मोठी घट
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी गुरुवारपेक्षा १५० कमी म्हणजे ८१६ नवे रुग्ण आढळले. तसेच गुरुवारपेक्षा ११ अधिक म्हणजे १३०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या ३ दिवसांत मिळून २४ मृत्यू झाले. एकुणच जिल्ह्यातील कोरोना संसर्गात चांगली घट दिसून आली. परभणी जिल्ह्यात गुरुवारपेक्षा २५० कमी म्हणजे ९२८ नवे रुग्ण आढळले. तर गुरुवारपेक्षा १०० कमी म्हणजे ४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येतही ४ ने घट होत १७ जणांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात संसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली.