August 19, 2022

संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनेल हॅक

Read Time:2 Minute, 49 Second

नवी दिल्ली : केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सविरोधात विधेयक आणत असल्याने सरकारच्या या धोरणाविरोधात क्रिप्टोकरन्स समर्थक आक्रमक झाले आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींचे अकाउंट हॅक करण्यात आले होते. आता संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनेल हॅक करण्यात आले आहे. यामुळे यूट्यूबने चॅनेल बंद केले आहे. तर केंद्र सरकारने चॅनेल हॅक झाल्याची माहिती दिली आहे.

१५ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा रात्री १ वाजता संसद टीव्हीच्या चॅनेलवर एक अनधिकृत लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यात आला. हॅकर्सनी चॅनेलचे नाव बदलून इथुरू केले. त्यामुळे आमच्या चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने या अलर्टची माहिती दिली. चॅनेल पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी आमची टीम काम करत आहे, असे पुनीत कुमार यांनी निवेदनात म्हटले आहे.

यूट्यूबचे धोरण काय आहे?
गुगुलने कंटेट क्रिएटर आणि चॅनेलच्या वापरकर्त्यांसाठी एक धोरण (पॉलिसी ) तयार केले आहे. या धोरणानुसार तुम्ही यूट्यूबवरून कमाई करत असाल, तर तुमचे चॅनेलने यूट्यूबवरील कमाईशी संबंधित धोरणाचे पालन करणे आवश्यक आहे. धोरणामध्ये यूट्यूबची कम्युनिटी मार्गदर्शक सूचना, सेवा अटी, कॉपीराइट आणि कार्यक्रम धोरणाचा समावेश आहे. ही धोरणे यूट्यूब भागीदार कार्यक्रमात सहभागी असलेल्या किंवा सहभागी होऊ इच्छिणा-यांना लागू होतात.

गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्यास काय होईल?
कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन करणारे व्हीडीओव्दारे कमाई करू शकणार नाहीत. त्याला व्यासपीठावरून हटवले जाईल. यूट्यूबवर कमाई करणा-या क्रिएटर्सनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कम्युनिटी गाइडलाइन्स संपूर्ण चॅनेलवर लागू होतात, केवळ विशिष्ट व्हीडीओवरच लागू होत नाहीत. अशा परिस्थितीत किएटर्सने या सर्व गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fifteen − 8 =

Close