संविधान साक्षरता अभियान अंतर्गत बोरगाव येथे ॲट्रॉसिटी कायदा मदत व पुनर्वसन कार्यशाळा संपन्न

Read Time:2 Minute, 38 Second

नांदेड-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे. (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायस्त संस्था) यांचे वतीने दि.26 नोव्हेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत संविधान साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
संविधान साक्षरता अभियान अंतर्गत समतादूत प्रकल्पाचे वतीने मौजे बोरगांव ता.लोहा येथे ग्राम पंचायत सांस्कृतिक सभागृह परिसरात अनुसूचित जाती ,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,1989 (ॲट्रासिटी) संदर्भातील तरतूदी व मदत पुनर्वसन या विषय माहिती पर कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांनी गावपातळीवर आपसात बंधुभाव आणि सलोख्याचे वातावरण व्रद्धिंगत करुन वाद व तंटे न करता प्रगतशील असावे असे आवाहन करुन अट्रोसिटी प्रतीबंध कायदा हा केवळ मागासवर्गीय लोकांच्या संरक्षण करण्यासाठी नाही तर सर्व समाजाच्या लोकांना प्रगतशील जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहे असे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमात समतादूत ज्योती जाधव,विनोद पांचंगे, ॲड.रामरावजी मल्हारे(सामाजिक कार्यकर्ते ), समतादुत विनोद पाचंगे यांनी सुद्धा अट्रोसिटी कायद्याबाबत माहीती सांगीतली.

कार्यक्रमास गावातील उपसरपंच शिवकुमार आढाव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर बालाजी घोरबांड, माजी सरपंच बळीराम घोरबांड हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. यासह असंख्य महिला व पुरूष वर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादूत ज्योती जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार राणीपद्मावती बंडेवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + 9 =