
“संजय राऊत माझ्यावर पाळत ठेवतात” महिलेच्या तक्रारीची हायकोर्टाने घेतली दखल! राऊतांच्या अडचणींत वाढ
शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते असणारे, आपल्या आक्रमक विधानांनी नेहमि चर्चेत असणारे संजय राऊत आता अडचणीत आले आहे. मुंबईतील एका मानसोपचार महिलेने संजय राऊतांच्याविरोधात काही दिवसांअगोदर तक्रार केली होती. आता थेट हायकोर्टाने या तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी करुन २४ जुनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहे.
संजय राऊत गेल्या सात वर्षांपासून मला छळत आहेत. काही गुंडांना हाताशी घेऊन ते सतत माझ्यावर पाळत ठेवतात व मला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देत असतात. अशा आशयाची यचीका मुंबईतील ३६ वर्षीय मानसोपचार तज्ज्ञ महिलेने दाखल केली होती. या याचिकेमध्ये मुंबई पोलिसांनासुद्धा प्रतिवादी करण्यात आले होते.
त्यामुळे हायकोर्टाने थेट पोलिस आयुक्तांना याप्रकरणी लक्ष घालून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान संजय राऊतांच्या या नविन प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात ऊमटण्यास सुरुवात झाली आहे. निलेश राणेंनी ट्वीट करत संजय राऊतांवर निशाना साधला आहे.
मराठी माध्यमे हे सर्व प्रकरण दाखवणार नाहीत, त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, हे प्रकरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे जरुरी आहे. संजय राऊतांचा या महिलेस प्रचंड त्रास आहे. दोन आठवड्यांपूर्वी या महिलेस अटकसुद्धा करण्यात आली होती. संजय राऊतांनी या महिलेचे आयुष्य बर्बाद केले आहेत.
प्रसाद ढाकेफाळकर हे संजय राऊतांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत आहे. मार्च महिन्यात झालेल्या सुनावणीत त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, सदर महिलेशी संजय राऊत यांचे कौटुंबीक संबंद्ध आहेत व ती राऊतांना मुलीसारखी असल्याचे म्हटले होते.