August 9, 2022

संजय राऊतांनी केला मोदी -ठाकरेंच्या भेटीचा खुलासा

Read Time:1 Minute, 35 Second

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.

तसेच त्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कधीच समजून घेतला नाही’ असा टोला राऊत यांनी सेनेच्या नेत्यांना लगावला.

जेव्हा उद्धव ठाकरे अब मेरे साथ दो और साथी है, उनको भी साथ लाना है. असे म्हणाले तेव्हा यावर पंतप्रधानांनी लगेच वेळ देतो असे सांगितले व पंतप्रधान कार्यालयाने बुधवारची वेळ नक्की केली. कोणाच्याही मध्यस्थीशिवाय मोदी-ठाकरे भेट झाली हे महत्त्वाचे’ असा खुलासा राऊत यांनी केला

एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही हे अमित शहा यांनी एकदा स्पष्ट केले. परिस्थिती अद्यापि तीच आहे’ असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 4 =

Close