संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

Read Time:2 Minute, 45 Second


मुंबई | शिवसेना खासदार  संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र राऊत यांच्या जामिनाला ईडीकडून (ED) जोरदार विरोध होत आहे. तर दुसरीकडे पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकरांनी संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केला आहे

पत्राचाळ प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी मोठा दावा केला आहे. घोटाळ्यातील पैसे संजय राऊत यांनी बनावट कंपन्यात वळवले असल्याचा दावा पाटकरांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा 14 दिवसांची वाढ झाली आहे. यामुळे आता 4 ऑक्टोबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत रहावं लागेल. ईडीने आरोपपत्र दाखल केलं असलं तरी न्यायालयाने ईडीला सुनावलं आहे.

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. तर ईडीनेही आरोपपत्र दाखल केले आहे. पण या आरोपपत्राची कॉपी मिळेपर्यंत खटल्याची सुनावणी दैनंदिनरित्या चालू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं.

ईडीकडून आरोपींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचं निदर्शनास आल्याने न्यायालयाकडून याप्रकरणी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊथ यांना पीएमएलए कायद्यांतर्गत अटक केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांकडून विशेष न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता.

ईडीकडून संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. तसंच पत्राचाळ प्रकरणाची चौकशी होईपर्यंत जामीन देऊ नये असंही ईडीने न्यायालयात सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-  

किंमत कमी आणि दर्जेदार फिचर्स, ‘या’ फोनच्या एन्ट्रीनं बाजारात मोठा धमाका | Lava Blaze Pro

“पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा”

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − 1 =