January 19, 2022

संगणक चोरी प्रकरणात चौघांना अटक

Read Time:2 Minute, 36 Second

नांदेड: प्रतिनिधी

चार चोरट्यांनी एक शाळेची लॅब फोडून त्यातील जुणे दहा संगणक चोरले होते. या साहित्याची किंमत १ लाख रुपये आहे. इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासाच्या आत पोलिसांनी चार चोरट्यांना गजाआड केले.

४ जानेवारी रोजी न्यायालयाने या चोरट्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या सुट्टीच्या कालखंडात रहेमतनगर, उस्मानपुरा, फसीयोद्दीन यांच्या घरात असलेली डॉ.झाकीर हुसेन हायस्कुल शाळेची संगणक लॅब चार चोरट्यांनी फोडली. ३ जानेवारी रोजी शाळेचे मुख्याध्यापक शेख अब्दुल कलीम अब्दुल अजीज हे सकाळी शाळेत आले तेंव्हा संगणक कक्षातील १० संगणक गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी इतवारा पोलीस ठाण्यात त्यांनी चोरीची तक्रार दिली. या बाबत गुन्हा क्रमांक ६/२०२२ कलम ४५७, ३८० भारतीय दंड संहितेनुसार दाखल करण्यात आला आहे. इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर भोरे आणि पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला. शेख असद यांनी आपले सहकारी यांच्यासह मेहनत करून या प्रकरणातील चार चोरटे अवघ्या काही तासातच गजाआड केले.

मोहम्मद फेरोज मोहम्मद सलीम (२८) रा.बिलालनगर, शेख आवेज शेख हबीब (२४) रा.इकबालनगर, मोहम्मद मुदसिर मोहम्मद फारुख (२१) रा.रहेमतनगर, शेख शोएब शेख हबीब (१९) रा.मोहम्मदीया कॉलनी अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर चोरट्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता या चौघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − twelve =

Close