श्रेयस देशपांडे यांच्या “वारी पंढरीची” गाण्याने दुमदुमले इंटरनेट विश्व


 

नांदेड -महाराष्ट्राच्या पारंपारिक आणि सांस्कृतिक धरोहरांच्या मध्ये उभ्या असलेल्या ‘पंढरीच्या वारी’चा एक नवा म्युझिक व्हिडीओ ‘वारी पंढरीची’ हा झी म्युझिक कंपनीच्या युट्युब चॅनेल वर प्रकाशित करण्यात आला आहे. या गाण्याच संगीत आणि गायन नवोदित कलाकार श्रेयस देशपांडे यांनी केलं आहे, ज्याने आपल्या संगीत शैलीने संबंध श्रोत्यांचे आणि संगीत प्रेमींचे मन जिंकले आहे.

‘वारी पंढरीची’ हे गाणं विठ्ठलाच्या भक्तांच्या भक्तिनिमित्त त्यांच्या पांडुरंगाला समर्पित आहे आणि यातून आपल्या संगीतसंस्कृतीचा एक आगळावेगळा प्रयोग दिसून येत आहे. वारी मधल्या वारकऱ्यांचे नैसर्गिक हावभाव टिपून आणि त्यांचे वारी मधले वेगवेगळे भक्तिमय उपक्रम टिपून ह्या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याचे बोल प्रचिती भागवत आणि श्रेयस देशपांडे यांनी लिहिले आहे.

या गाण्याचा मुख्य कोरस गायिका अंजली जोशी, सुचेता गोसावी आणि मनाली दीक्षित यांनी गायला आहे. या गाण्याच्या रिदम आणि पखवाज गणेश शेडगे आणि कृष्णकांत राऊत यांनी अप्रतिम वाजवला आहे आणि तसेच त्याचे मिक्सिंग आणि मास्टरिंग तन्मय संचेती यांनी केले आहे.

या गाण्याच्या संपादनाची जबाबदारी उन्मेश कोरडे यांनी निभावली आहे, आणि त्याचे सुपरव्हिजन दिग्दर्शक श्रेयस भगवत यांनी केले आहे. या गाण्याच्या शूटिंग मितेश चिंदरकर, नितेश चिंदरकर आणि ड्रोना ibx यांनी संपन्न केल आहे. या गाण्याच्या ऑडिओ आणि व्हिडिओ उत्पादन पुण्यातील झिल स्टूडिओ मध्ये संपन्न झाल आहे. ‘वारी पंढरीची’ गाण्याचा प्रदर्शन सोहळा पुण्यातील विठेश्वर मंदिरात पार पडला. यावेळी नगरसेविका सौ. लक्ष्मी दुधाने, अभिनेता अमित दुधाने, संगीतकार गायक श्रेयस देशपांडे तसेच समस्त कलाकार आणि प्रेक्षक उपस्थित होते. तसेच या गाण्यासाठी श्रेयस यांनी डॉ.जयेश काटकर,अनुश्री फिल्म्स चे मयूर तातूस्कर आणि झी ग्रुप चे आदित्य निकम यांचे आभार मानले.

‘वारी पंढरीची’ असा हा उत्कृष्ट म्युझिक व्हिडीओ पारंपरिक वारीच्या संस्कृतीच दर्शन घडवणारा आहे. श्रेयस यांच्या संगीताने आणि मधुर आवाजाने वारी पंढरीची हे गाणे समस्त पंढरीच्या भक्तांना अद्वितीयता वाटणारे आहे आणि झी म्युझिक मराठी च्या युट्युब चॅनेल वर सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.


Share this article:
Previous Post: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्यांनी वाढला

July 10, 2024 - In Uncategorized

Next Post: सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेशाम मोपलवारकडे 3 हजार कोटी पेक्षा जास्तची बेहिशोबी मालमत्ता-आ.रोहित पवार

July 11, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.