श्रीनगर भागात चार महिला 5 पुरूष आणि अत्यंत छोटी बालके यांच्या टोळीने सराफा दुकान फोडून चोरी केली


नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील श्रीनगर भागात पंचशिल या दुकानासमोर असलेल्या एका सराफा दुकानात चोरट्यांनी अत्यंत पध्दतशिरपणे दुकानासमोर झोपून चोरी केली आहे. चोरी करण्याअगोदर त्यांनी कॅमेरा फोडला आहे. या टोळक्यात चार महिला, पाच पुरूष अत्यंत छोटी बालके सुध्दा होती.
आज पहाटे मुंजाजी नागनाथराव उदावंत पावडेवाडीकर हे सराफा दुकान उघडण्यासाठी मालक आले असता दुकानाचे शटर वाकलेले होते. या शटरला कव्हर करण्यासाठी बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता. 5 जुलैच्या मध्यरात्री 12.40 वाजेपर्यंत या कॅमेऱ्यामधील सीसीटीव्ही फुटेज दिसतात. त्यामध्ये चार महिला, पाच पुरूष आणि छोटी-छोटी बालके दिसत आहेत. पध्दतशिरपणे या दुकानासमोर आपण झोपलो आहोत असा आव या लोकांनी आणला. त्यानंतर संधीची वाट पाहुन त्यांनी 12.40 मिनिटाला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर दुकानाचे शटर वाकवून एक बालक मध्ये पाठविण्यात आला. या बालकाने मधून सर्व किंमती ऐवज बाहेर आणून दिला आणि हे सर्व चोरटे निघून गेले आहेत. मालकाने सांगितल्याप्रमाणे तीन किलो चांदी, चार तोळे सोने आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज दुकानातून चोरीला गेलेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया वृत्तलिपर्यंत पुर्ण झालेली नव्हती.


Share this article:
Previous Post: मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

July 5, 2024 - In Uncategorized

Next Post: नांदेड जिल्ह्यात जवळपास 12 पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या

July 5, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.