July 1, 2022

श्रमिक मुक्ती दलाचे नेते डाॅ.भारत पाटणकर यांना बोधी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Read Time:5 Minute, 25 Second

श्रमिक मुक्ती दलाचे नेते डाॅ.भारत पाटणकर यांना बोधी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नांदेड – श्रमिक मुक्ती दलाचे नेते डाॅ.भारत पाटणकर यांना बोधी जीवन गौरव पुरस्कार, मानपत्र देऊन बोधी फाऊंडेशन आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी बोधी फाऊंडेशनचे आभार मानत या सन्मान सत्काराला उत्तर देताना डाॅ. भारत पाटणकर बोलताना म्हणाले की, आपल्या लढाया सुट्ट्या -सुट्ट्या आणि विभाजित आहेत आपली स्वप्ने विखुरलेली आहे आणि आज तर तरूणांनी स्वप्न बघणेच बंद केलेलं आहे.

तर आजही नव्याने व्यवस्था बदलाचे, परिवर्तनाचे  स्वप्न आपण बघायला हवं. जे बुध्दांनी बघितलं, जे फुले आंबेडकरांनी बघितलं तसं आपण पूर्ण व्यवस्था बदलांचे स्वप्न पाहिले पाहिजे.

मनुस्मृती दहन दिवसानिमीत्ताने विशेष व्याख्यानातील बोलताना
भारतातील स्त्रियांच्या आयुष्यात
अलीकडच्या काळात मोठा बदल झालेला आहे. स्त्रियांचा जो मानसिक आणि सामाजिक विकास झालेला आहे त्यामध्ये भारताचे संविधान आणि सामाजिक चळवळींचा
वाटा मोठा आहे. यापुढे स्त्रियांनी परंपरेला न कवटाळता आधुनिकतेची आणि समतेची कास धरावी आणि स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे. त्यांनी समता आणि विवेक या मूल्यांचा स्वीकार करून समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन टाटा समाजविज्ञान संस्थेमधील स्त्री अभ्यास केंद्राच्या माजी संचालक डॉ. वंदना सोनाळकर यांनी यावेळी केले.

या  सत्कारात पुरोगामी संघटनांच्यावतीने विशेष उपस्थित असलेल्या डाॅ. व्यंकटेश काब्दे यांनी भारत पाटणकर यांच्या त्यागापुढे, धरणग्रस्त, शेतकरी कष्टकर्यांच्या प्रश्नांच्या बांधिलकीला सलाम करत त्यांच्या समग्र जीवनप्रवासाचा आढावा घेतला.

धम्मसंगिनी रमागोरख यांनी बोधी फाऊंडेशनच्या वतीने चळवळीतील ठळक योगदान देणार्या सन्माननीयांचा सत्कार जीवनगौरवाने करण्यामागची आणि या पहिल्याच

जीवनगौरव पुरस्कारासाठी डाॅ. पाटणकर यांची निवड करण्यामागची आणि  भूमिका आपल्या प्रस्ताविकात मांडली.

समाजबदलासाठी प्रशिक्षण, प्रबोधन, संशोधनाच्या स्तरावर पुढाकार घेऊ इच्छिणारे बोधी फाऊंडेशन हे परिवर्तनाच्या चळवळीत प्रयोगशील, प्रामाणिकपणे योगदान देणार्या कार्यकर्त्यांचा सन्मानादर कायमच करीत राहील. अभ्यासक आणि जनचळवळीतील कार्यकर्त्यांमधला दुवा असल्याचे बोधी फाऊंडेशनच्या कार्यकारी सचिव धम्मसंगिनी रमागोरख म्हणाल्या.

या कार्यक्रमास नांदेडमधील भारत पाटणकरांचे जुने सहकारी काॅ.अॅड. अरविंद देशपांडे प्रकृतीची परवा न करता उपस्थित होते.

भारत पाटणकर यांच्या पत्नी जागतिक किर्तीच्या विदुषी गेल आॅमवेट यांना नांदेडमध्ये 1975 साली आणण्याची तसेच नामातंर काळात पॅन्थरचे महत्त्वाचे नेते एस. एम. प्रधान यांच्यासह योगदान दिल्याची , गेल यांना वस्त्यांमध्ये फिरवल्याची आपली जुनी आठवणी काॅ.देशपांडे  यांनी यावेळी जाग्या केल्या.

या कार्यक्रमात मानपत्राचे वाचन  डाॅ. राजेन्द्र गोणारकर यांनी केले. बोधीच्या गौरवपत्राचे वाचन डाॅ. सचिन सरोदे यांनी केले.

नांदेडमधील सर्व पुरोगामी पक्ष संघटनांच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नांदेडकरांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवली होती.

कार्यक्रमाचे नांदेडमधील सहकारी आयोजक सत्यशोधक  महिला संघटना, आजाद समाज पार्टी, लसाकम, अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद, लोक स्वराज्य आंदोलन, प्रागतिक विचार मंच, समाजवादी अध्यापक सभा, एमपुक्टो, स्वामुक्टा,  माकप, भाकप, बाभळी बंधारा कृती समीती अनिस, आदी पक्षसंघटनांनी महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्याचे बोधीच्या वतीने सांगण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + two =

Close