शैक्षणिक पॅटर्नची बदनामी थांबवा : मोटेगावकर

Read Time:2 Minute, 25 Second

प्रतिनिधी
दि. १४- सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून नांदेड व लातूर येथील पवित्र शैक्षणिक पॅटर्नला बदनाम केले जात आहे. ही निंदनीय बाब आहे. मराठी माणसांनी उभ्या केलेल्या या पॅटर्नवर परराज्यातील  कॉर्पोरेट संस्था आल्या तर शिक्षण महागडे होईल, यासाठी सोशल माध्यमातून सुरू असलेली बदनामी थांबवा, अशी मागणी आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी केली.
ज्या पेजवरून पेड बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचे नाव मराठी आहे, हे नवल आहे. कोचिंगच्या मराठी ब्रँडबद्दल संशय, जाहिरातींमध्ये संपर्क दिलेल्या असतात, एक फोन करून कोचिंग चालकांकडून स्पष्टीकरण मागवता आले नसते, २५ वर्षांपासून ज्यांनी
डॉक्टर्स आणि इंजिनिअर घडवले, त्यांनी आणखी किती परीक्षा द्यायच्या, का त्यांना माफिया पदवी देऊन मोकळे व्हायचे, डॉक्टरांनी शुल्क घेतलेले चालते, वकिलानेही घेतलेले चालते, पैसे भरून नोकरी चालते, सर्वकाही चालते. पण सामान्य मराठी माणूस एकत्र येत देशाच्या शिक्षण व्यसवस्थेत मराठी पॅटर्न ठळक करीत असताना स्वतःला मराठी समजणाऱ्यांनी असे आडवे येवू नये, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतून दरवर्षी शेकडो
आयएएस आणि आयपीएस घडतात. त्यांची पूर्व परीक्षा, मुख्य
परीक्षा, मुलाखत व निबंध लेखन
यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या
कोचिंगची मदत घेतात. त्यांचा निकाल लावण्याचा अधिकार कोचिंगला देतात. मग नीट परीक्षेला
फिजिक्स, केमिस्ट्री बायोलॉजीच्या
तयारीसाठी वेगळे क्लासेस लावले
तर बिघडले कुठे, असा सवालही
मोटेगावकर यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen + three =